जेएनएन, नागपूर. Maharashtra News: अतिवृष्टी आणि सततच्या दमट हवामानामुळे विदर्भातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. विदर्भातील 10 जिल्ह्यातील सोयाबीन पिकावर येलो मोजक (Yellow Mosaic) रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे.

सोयाबीनची पिके पूर्णपणे उध्वस्त 

नागपूर, वर्धा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, अमरावती जिल्ह्यात येलो मोजकचा मोठा प्रभाव दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांची सोयाबीनची पिके पूर्णपणे उध्वस्त झाली आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून शासनाच्या मदतीची मागणी वाढली आहे.

अतिवृष्टीमुळे दुहेरी फटका

  • मुसळधार पावसामुळे संत्रा व मोसंबीच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर फळगळ सुरू झाली आहे.
  • त्यातच सोयाबीनवर रोगराई फैलावल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान प्रचंड वाढले आहे.
  • अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक हातातून गेले आहे.पुढील हंगामासाठी बियाणे आणि कर्जफेड यांचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक, नाशिक घाट, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशीव, अमरावती, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ.