एजन्सी, नाशिक: सोशल मीडियावर आयुष्यातील निराशा व्यक्त केल्यानंतर एका 17 वर्षीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ही नाशिक येथे घडली आहे. त्यांच्या स्वतःच्या कॉलेजच्या कॅम्पसमध्येच आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली.

आयुष चव्हाण असे मृताचे नाव असून तो शहरातील गंगापूर रोड परिसरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होता.

पाचव्या मजल्यावरून मारली उडी

4 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.45 वाजता चव्हाण यांनी त्यांच्या कॉलेजच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली. डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी सांगितले की, अत्यंत टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी चव्हाणने इन्स्टाग्रामवर जीवन संपवण्याची इच्छा व्यक्त केली होती.

म्हणून, आयुष्यातून निघून जात आहे

    "मित्रांनो, ही शेवटची वेळ आहे. आयुष्यात माझे कोणतेही स्वप्न किंवा ध्येय नाहीये. मी माझ्या आयुष्याला कंटाळलो आहे. म्हणून, आयुष्यातून निघून जात आहे", असे तो म्हणाला. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.