जेएनएन, अहिल्यानगर. राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्यासह 'आप'चे (AAP) दोन-तृतीयांश राज्यसभा खासदार भाजपमध्ये प्रवेश करत असल्याच्या  पार्श्वभूमीवर, सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अण्णा हजारे हे या राघव चड्ढा आणि इतर खासदारांवर चांगलेच खडसावले आहेत.

अण्णा हजारे काय म्हणाले…

"एका पक्षाचा त्याग करून दुसऱ्या पक्षात सामील होणे योग्य नाही... आपल्या स्वार्थी गरजांसाठी राजकीय पक्ष बदलणे ही योग्य गोष्ट नाही. आपल्या संविधानात याचा उल्लेख नाही. आपले संविधान सर्वोच्च आहे. आपला देश संविधानावरच चालतो..." असे त्यांनी म्हटले आहे. 

राघव चड्ढा काय म्हणाले होते…?

संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांच्यासोबत पत्रकार परिषदेला संबोधित करताना 'आप'चे खासदार राघव चड्ढा म्हणाले, "राज्यसभेत 'आप'चे दोन-तृतीयांश सदस्य असल्याने, आम्ही भारतीय संविधानातील तरतुदींचा वापर करून भाजपमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे."

हेही वाचा - नाशिक टीसीएस प्रकरणात धक्कादायक खुलासे; 'नशीला शीर खुरमा, काळी जादू अन्...' 

    हे खासदार होणार भाजपात सामील?

    राघव चढ्ढा, अशोक कुमार मित्तल आणि संदीप पाठक यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हरभजन सिंग, राजिंदर गुप्ता, विक्रमजीत साहनी आणि स्वाती मालीवाल यांची नावेही घेतली.