जेएनएन, नागपूर.Tree Bank:  केंद्र शासनाच्या ‘एक पेड माँ के नाम 2.0’ आणि राज्य शासनाच्या ‘हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीने धरमपेठ झोन येथील रामनगर परिसरातील शिवाजीनगर उद्यानात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते मंगळवारी (ता.12) ‘ट्री बँक’चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत शहरातील नागरिकांना 20 हजार वृक्षाचे 30 सप्टेंबर पर्यंत नि:शुल्क वाटप करण्यात येणार आहे.

 केंद्र शासनाच्या ‘एक पेड माँ के नाम 2.0’ आणि महाराष्ट्र शासनाच्या ‘हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत एक कोटी झाडे राज्यात लावले जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीने  शहरातील दहा उद्यानात ट्री बँक तयार करण्यात आली असून, या माध्यमातून नागरिकांना 20 हजार झाडांचे नि:शुल्क वाटप करण्यात येणार आहे. पुढे डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले की, मनपा नेहमीच पर्यावरणाप्रती सजग आहे.

मनपातर्फे वाटप करण्यात येणाऱ्या झाडाचे नागरिकांनी जतन केल्यास पर्यावरण मोहिम यशस्वी होईल. पर्यावरण संरक्षणासाठी असलेला उपक्रमास नागरिकांचा मोठा सहभाग असला तर अधिक चांगल्या पद्धतीने यशस्वी करता येईल. असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. नागरीकांना आपले घराचे परिसरात लावण्याकरीता एक वृक्ष मोफत पुरविण्यात येणार असून नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन मनपा आयुक्त ह्यांचेद्वारे करण्यात आले.

शहरातील दहा उद्यानात ‘ट्री बँक’ 

महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र’ ही मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शिवाजीनगर उद्यानासह , त्रिमुर्ती नगर उद्यान,, हनुमान नगर उद्यान, महात्मा फुले उद्यान सुयोग नगर, संत ज्ञानेश्वर उद्यान, गांधीबाग उद्यान, तुलसीनगर उद्यान, लता मंगेशकर उद्यान, डॉ. बाबासाहेब उद्यान वैशालीनगर, सखाराम मेश्राम उद्यान अशा शहरातील दहा उद्यानात ‘ट्री बँक’ तयार करण्यात आली आहे. नागरिकांना सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत या उद्यानात नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे सिरम, आंबा, आवळा, बकुळ, वड, अशोका, कडुनिंब, कदंब, जांभूळ, चिकू,  पिंपळ, आवळा, वड, आरोळा सह इतर झाडांचे नि:शुल्क वाटप करण्यात येणार आहे. मनपातर्फे नागरिकांना नि:शुल्क वाटप करण्यात येणाऱ्या  झाडांचा डेटा जतन केला जाणार आहे.

हेही वाचा:Nagpur Weather Update Today: पुढील तीन दिवस नागपूर जिल्ह्यासाठी पावसाचा येलो अलर्ट