जेएनएन, नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी -2025 लेखी परीक्षेची वेळापत्रके विद्यापीठाच्या https://www.nagpuruniversity.ac.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहेत. सदर वेळापत्रकातील दि. 14  जानेवारी 2026, 15 जानेवारी 2026, 16 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या हिवाळी 2026 लेखी परीक्षांचे पेपर नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे रद्द करण्यात आले आहे. परीक्षा यापूर्वीच्या नमूद केलेल्या वेळापत्रकातील वेळेनुसार नियोजित परीक्षा केंद्रावर सुधारित वेळापत्रकानुसार घेतली जाणार आहे. 

यासंदर्भात सर्व प्राचार्य, केंद्राधिकारी, संबंधित महाविद्यालये, परीक्षा केंद्र यांना पत्राद्वारे परीक्षा विभागाकडून कळविण्यात आले असून, संबंधितांनी याची सर्व विद्यार्थ्यांना जाणीव करुन द्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक श्री मनीष झोडपे यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर परीक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.

अ.क्र.अभ्यासक्रम (Course)सेमेस्टरअभ्यासक्रम पद्धत
1बीएससी (Home Science)3 सेमOld
2बीएससी (Home Science)5 सेमRegular
3बीएससी (Forensic Science)3 सेमOld
4बीएससी (Forensic Science)5 सेमRegular
5बीएससी3 सेमNEP
6बीएससी3 सेमOld
7बीएससी5 सेमRegular
8बीएससी (Information Technology)3 सेमOld
9बीएससी (Information Technology)5 सेमRegular
10Bachelor of Computer Application (BCA)3 सेमOld
11Bachelor of Computer Application (BCA)5 सेमRegular
12Bachelor of Commerce (B.Com)5 सेमOBE & CBCS
13Bachelor of Commerce (B.Com)5 सेमOld
14बीए3 सेमNEP
15बीए3 सेमCBCS & Old
16बीए5 सेमCBCS & Old
17बीए (Rural Service)3 सेमNEP
18बीए (Rural Service)3 सेमOld
19बीए (Rural Service)5 सेमRegular
20Master of Computer Application (MCA)3 सेमNew & Old
21Master of Computer Application (MCA)3 सेमCBCS
22Master of Fine Arts (MFA)3 सेमCBCS (NEP)
23Master of Social Work (MSW)3 सेमCBCS (NEP) & Old