जेएनएन, नागपूर. Marbat Utsav 2025: 22 ऑगस्ट रोजी बडग्या व मारबत उत्सव  मंडळाची स्थापना करण्यात येऊन त्यांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. यामध्ये मोठी पिवळी मारबत जागनाथ बुधवारी येथून निघून गोळीबार चौक मार्गे मस्कासाथ या चौकातून नेहरू पुतळा येथे येत असते. या ठिकाणीच नेहरू पुतळ्या लगत असणारी काळी मारबत नेहरू पुतळा चौकात येत असते. तसेच लहान पिवळी मारबत ही सुध्दा गोळीबार चौकातून मस्कासाथ मार्गे नेहरू पुतळा चौक येथे येत असते. मोठी पिवळी मारबत व काळी मारबत यांची नेहरू पुतळा चौक येथे भेट झाल्यानंतर  तिन्ही मारबत शहीद चौकात येतात. त्या ठिकाणी इतर छोट्या मारबती व बडगे मिरवणूकीत सामील होत असतात. पुढील मार्ग शहीद चौक, टांगा स्टैंड चौक, गांधीपुतळा, बडकस चौक, महाल चौक, गांधीगेट चौक, विटणीस पार्क, अग्रसेन चौक, गांजाखेत येथून मोठी पिवळी मारबत गोळीबार चौकातून नाईक तलाव येथे विसर्जनासाठी जात असते. काळी मारबत गांजाखेत चौकातून जुना भंडारा रोडने शहीद चौक मार्गे हरीहर मंदिर येथे विसर्जनासाठी जात असते.

मिरवणूक पाहण्याकरीता लोकांची प्रचंड गर्दी होऊन वाहतुकीची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याकरीता शहरातील वाहतूक सुरळीत राहावी व सामान्य नागरीकांची गैरसोय किंवा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी खालीत प्रमाणे वाहतूक नियमन करण्याचा दृष्टीने वाहतुकीवर निर्बंध घालण्यासाठी किंवा आवश्यकतेप्रमाणे वाहतूक वळविण्यासाठी पोलीस उप आयुक्त (वाहतूक) लोहित मतानी  यांनी अधिसूचना जारी केली आहे.

पिवळी मारबत

मोठी पिवळी मारबत जागनाथ बुधवारी येथून निघाल्यावर गोळीबार चौकात येण्यापूर्वी गांजाखेत कडून गोळीबार चौकाकडे येणारी वाहतूक तीन नल चौक, नालसाहब चौककडे वळविण्यात येत आहे. तसेच गार्ड लाईन कडून मोमिनपुरा चौक मार्गे गोळीबार चौकाकडे येणारी वाहतूक मोमिनपुरा चौकातुन भगवाघर चौक मार्गे दोसर भवन चौकाकडे वळविण्यात येईल. कमाल चौकातुन गोळीबार चौकाकडे येणारी वाहतूक बाळाभाऊ पेठ, वैशाली नगर चौकाकडे वळविण्यात येईल. नेहरू पुतळा चौक येथे मारबत भेट असल्याने व मिरवणुकीचा मार्ग असल्याने मारवाडी चौकाकडून येणारी वाहतूक इतवारी पुलीया तसेच जुना मोटर स्टॅन्डकडे वळविण्यात येईल. तसेच परतीच्या वेळी शांतीनगरकडून येणारी वाहतूक दही बाजार पुलीया खालून लालगंज, मेंहदीबाग पुलीया अंडरब्रीज कडुन वैशाली नगरकडे वळविण्यात येईल. तीन नल चौकाकडून भारत माता चौकाकडे येणारी तसेच शहीद चौकातून मस्कासाथ चौकाकडे येणारी वाहतूक ही गांजाखेतकडे तसेच नंगापुतळा व गांधीपुतळाकडे वळविण्यात येईल.

गांधीपुतळा चौकात मिरवणूक आल्यानंतर संत्रा मार्केट ओव्हर ब्रिज कडून येणारी वाहतूक ही अग्रसेन चौकातून गोळीबार चौकाकडे व चिटणीस पार्क चौकाकडे तसेच टेलीफोन एक्सचेंज चौकाकडून संत्रा मार्केट ओव्हर ब्रिजकडे येणारी वाहतूक चंद्रशेखर आझाद चौकातून जुना मोटर स्टॅन्ड चौकाकडे व लाकडीपुल चौकाकडे वळविण्यात येईल. बडकस चौकात मिरवणूक येण्यापूर्वी बडकस चौकात चिटणीस पार्क चौकातून येणारी वाहतूक गांधीगेट कडे व अग्रसेन चौकाकडे वळविण्यात येईल. व लाकडीपुलाकडुन बडकस चौकाकडे येणारी वाहतूक चंद्रशेखर आझाद चौकाकडे तसेच झेंडाचौक महाल कडे वळविण्यात येईल. महाल चौकात मिरवणूक येण्यापूर्वी महाल चौकात झेंडा चौकातून येणारी वाहतूक लकडापुल तसेच भोलागणेश चौकाकडे वळविण्यात येईल, तसेच गांधीगेट कडून येणारी वाहतूक चिटणीस पार्क चौकाकडे व रामकुलर चौक तसेच टिळक पुतळयाकडे वळविण्यात येईल.

गांधीगेट येथे मिरवणूक येण्यापूर्वी राम कुलर चौकाकडून येणारी वाहतूक मॉडल मिल चौकाकडे तसेच सी.पी. अॅन्ड बेरार कॉलेजकडे वळविण्यात येईल व टिळक पुतळयाकडून गांधीगेट कडे येणारी वाहतूक नातीक चौक तसेच गणेश मंदीरकड़े वळविण्यात येईल, तसेच चिटणीस पार्क चौकाकडुन येणारी वाहतु‌क बड़कस चौक व नातीक चौकाकडे वळविण्यात येईल.

चिटणीस पार्क चौक येथे मिरवणूक येण्यापूर्वी बडकस चौकातून येणारी वाहतूक महाल चौकाकडे तसेच गांधी पुतळयाकडे वळविण्यात येईल. नातीक चौकातुन येणारी वाहतूक टिळक पुतळा तसेच एम्प्रेस मॉल सिटीकडे वळविण्यात येईल. तसेच अग्रसेन चौकाकडून चिटणीस पार्ककडे येणारी वाहतूक संत्रामार्केट ओव्हर ब्रिज व गांधीपुतळ्याकडे वळविण्यात येईल. अग्रसेन चौकात मिरवणूक येण्यापूर्वी गांधी पुतळयाकडून येणारी वाहतूक बडकस चौकाकडे व टांगा स्टॅन्डकडे वळविण्यात येईल व संत्रा मार्केट ओव्हर ब्रिज कडून  येणारी वाहतूक कॉटन मार्केट चौक व गार्ड लाईनकडे वळविण्यात येईल. गांजाखेत चौकात मिरवणूक येण्यापूर्वी कमाल चौकाकडून गोळीबार चौकाकडे येणारी वाहतूक बंद करण्यात येईल. तसेच मोमिनपुरा चौकातून गोळीबार चौकात येणारी वाहतूक मोमीनपुरा चौकातुनच भगवाधर चौकाकडे वळविण्यात येईल.

काळी मारबत
काळी मारबत गांजाखेत चौकातून जुना भंडारा रोडने हरीहर मंदीराकडे जात असताना तीन नल चौक, शहीद चौक, सुनील हॉटेल चौक या ठिकाणी बाहेर येणारी वाहतूक बंद करण्यात येईल. तसेच जुना भंडारा रोडने सुनील हॉटेल चौकाकडे येणारी वाहतूक बंद करण्यात येईल. पॉवर हाऊस चौकाकडुन येणारी वाहतूक सुनील हॉटेलकडून डावे वळण घेऊन टेलिफोन एक्सचेंज चौक मार्गे वळविण्यात येईल. बडग्या मिरवणूक डिप्टी सिग्नल येथून निघतेवेळी व परतीच्या वेळी डिप्टी सिग्नलकडे जाणारी वाहतूक वर्धमान नगर चौक मार्गे प्रजापती रेल्वे क्रॅासिंग व हिरवी नगर चौकाकडे वळविण्यात येईल. ही अधिसूचना दि. 23 ऑगस्ट रोजी 6 वाजेपासून बडग्या, पिवळी व काळी मारबत मिरवणूक संपेपर्यंत अंमलात राहील.