जेएनएन, नागपूर: महाराष्ट्र विधानसभामध्ये (Maharashtra Winter Session 2025) विरोधी पक्षनेत्याच्या पदासाठी महाविकास आघाडीने (MVA) आपला दावा औपचारिकरित्या सादर केला आहे. आज MVA च्या वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन विरोधी पक्षनेतेपदाची मागणी केली.
विरोधी पक्षनेतेपद MVA ला देण्याची मागणी
या शिष्टमंडळात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. माविआने एकत्रितपणे विधानसभेत सर्वाधिक जागा असलेला विरोधी गट MVA असल्याचे सांगत, नियमांनुसार विरोधी पक्षनेतेपद MVA ला देण्याची मागणी केली.
विरोधी पक्षनेतेपद अत्यंत महत्त्वाचे
माविआच्या नेत्यांनी अध्यक्षांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विधानसभा अधिवेशनादरम्यान सरकारच्या धोरणांवर अर्थपूर्ण चर्चा व्हावी, जनतेच्या प्रश्नांना आवाज द्यावा आणि शासनाला जबाबदार धरण्यासाठी विरोधी पक्षनेतेपद अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे या पदावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली.
विरोधी पक्षाची ताकद कमी करण्यासाठी
दरम्यान MVA ने आरोप केला की, शासन पक्षाकडून जाणूनबुजून निर्णय लांबवण्यात येत असून विरोधाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. विरोधी पक्षाची ताकद कमी करण्यासाठी सरकार हे पाऊल उचलत आहे’ अशी टीका ही काँग्रेसने केली आहे.
राहुल नार्वेकर यांनी MVA च्या मागणीची नोंद घेतली असून नियम, परंपरा आणि विधानसभेच्या प्रक्रियेनुसार निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. पुढील काही दिवसांत या प्रकरणावर अंतिम निर्णय अपेक्षित असून विरोधी पक्षनेत्याच्या निवडी होणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.
