जेएनएन, नागपूर. Maharashtra Rain Update: गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपुर जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पाऊस तर काही भागात अतिवृष्टी झाली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर सर्वदूर मुसळधार पाऊस झाला आहे. भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नागरिकांनी आवागमन करताना काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केले आहे. अनेक रस्ते वाहतूकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

वैनगंगा नदीची पाण्याची पातळी वाढली

8 जुलै 2025 रोजी सकाळी 7:07 वाजता कारधा येथे वैनगंगा नदीची पाण्याची पातळी 244.94 मीटर नोंदवली गेली, जी 245.00 मीटरच्या धोक्याच्या चिन्हाजवळ पोहोचली. धोक्याची पातळी 245.52 मीटरवर असल्याने, अधिकारी सतर्क आहेत आणि संभाव्य पूर टाळण्यासाठी परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने यांनी केले आहे.

गोसीखुर्द धरणाचे सर्व दरवाजे उघडले

गोसीखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे 1 मीटर उघडून 6962.92 क्युसेक पाणी सोडण्यात आले. वैनगंगा नदीजवळील लोकांना सतर्क राहण्याचे आणि सावधगिरी बाळगण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

अनेक रस्ते बंद

    गोंदिया जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस असल्याने अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून नवेगाव, देवरी, अर्जुनी मोरगाव आमगाव हद्दीतील रस्ते बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती गोंदिया जिल्हा प्रशासनानं दिली आहे.

    हेही वाचा - Language Row: ठाण्यात वातावरण तापलं, आंदोलक मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेलतं ताब्यात, मुख्यमंत्री म्हणाले…