जेएनएन, नागपूर, Maharashtra Rain Update: भंडारा जिल्ह्यात मागील 24 तासापासून पावसाची संततदार सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदी, नाले, ओसंडून वाहन आहेत. तर ग्रामीण भागातील छोटे नाले हे दुतळी भरून वाहत असून अनेक नाल्यांवरून पाणी वाहत आहे. तर अनेक शेतकऱ्यांची शेती सुद्धा पाण्याखाली गेली असून, या पावसाचा फटका शेतकऱ्यांना सुद्धा बसलेला आहे.
भंडारा जिल्ह्यात मागील 24 तासापासून पावसाची संततदार सुरू आहे तर या पावसामुळे गोसीखुर्द धरणाचे 33 ही दरवाजे खुले करण्यात आले असून, वैनगंगा नदीची धोका पातळी 245.50 मीटर इतकी आहे.
सिहोरा मंडळात 231.50 मिमी सर्वाधिक पावसाची नोंद
मागील 24 तासांत जिल्ह्यात 114.50 मिमी पाऊस पडला असून सर्व सातही तालुक्यातील 38 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस तुमसर तालुक्यातील सिहोरा मंडळात 231.50 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक रस्ते बंद पडले असले तरी पर्यायी मार्ग असल्याने कोणत्याही गावांचा संपर्क तुटलेला नाही.
आज आणि उद्या सुट्टी जाहीर
भंडारा जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने भंडारा जिल्ह्यात अनेक भागात अचानक पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक तालुक्यातील रस्ते मार्ग हे पुराच्या पाण्याने प्रभावीत झाले असून जिल्ह्यातील 18 रस्ते हे पुरामुळे वाहतुकीस बंद करण्यात आलेले आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपतकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये या करिता जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, शाळा व महाविद्यालये मधिल विद्यार्थाना आज आणि उद्या असे दोन दिवस सुट्टी देण्याचे जिल्हाधिकारी डॉ.संजय कोलते यांनी जाहीर केले आहे.
जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना आज 8 व उद्या 9 जुलै रोजी सुट्टी जाहिर करीत आहे.
गोंदियात आज दिली सुट्टी
मोरगाव तालुक्यातील 10, देवरी तालुक्यातील 10 आणि गोंदिया तालुक्यातील 1 पावसामुळे मार्ग बंद झालेला आहे आणि विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही म्हणून जिल्हाधिकारी यांनी आज जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे, असं प्रशासनाने सांगितलं.