एजन्सी, गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील एका शेतातील तलावात बुडून दोन किशोरवयीन मुले आणि एका 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले.

देवरी तहसीलमधील पुराडा गावात रविवारी रात्री उशिरा आदित्य सुनील बैस (15), तुषार मनोज राऊत (17) आणि अभिषेक रामचरण आचले (21) हे बुडाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

साक्षगंधाच्या कार्यक्रमानंतर...

पुराडा येथे असले कुटुंबात मुलाच्या साक्षगंधाचा कार्यक्रम रविवारी होता. या कार्यक्रमाला सायंकाळच्या सुमारास गावातील नागरिक व मित्रमंडळी जेवण करायला आले होते. याच कार्यक्रमात गदेवारटोला (पुराडा) येथील एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते.

मृतदेह सापडले

जेवण केल्यानंतर तिघेही मोटरसायकलने पुराडा येथील देश माता परिसरात फिरत असल्याचे गावकऱ्यांनी पाहिले. मात्र रात्री 8 वाजेनंतर तिघेही तरुण घरी न पोहचल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी व गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला. तेव्हा गावाजवळील गदाईबोडी जवळ तरुणांची मोटारसायकल दिसली. त्यानंतर काही अंतरावर छत्री व तरुणांच्या चपला आढळल्या. त्यानंतर लगेचच मृतदेह सापडले, असे सालेकस पोलिस ठाण्याचे निरीक्षक भूषण बुराडे यांनी सांगितले.