महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन (Winter Session 2025) हे नागपुरात 8 ते 14 डिसेंबर कालावधीत होत आहे. नागपुरात यंदा हिवाळी अधिवेशन (Nagpur Winter Session Live) आठवडाभरच चालणार आहे. अधिवेशनात होत असलेल्या महत्त्वाच्या घडामोडी आणि चर्चा यांची लेटेस्ट अपडेट आपल्याला या लाईव्हच्या माध्यमातून पाहता येईल.

  • 2025-12-10 20:11:23

    Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये कधी मिळणार?

    विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की लाडकी बहीण योजनेतील मानधन 1500 वरून 2100 रुपये करण्याचा निर्णय योग्य वेळी शासकीय नियमानुसार घेतला जाईल. सविस्तर वाचा - Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये कधी मिळणार? एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
  • 2025-12-10 20:09:31

    Nagpur Session News: सोसायटीची 'ना हरकत' घेणे बंधनकारक - अजित पवार

    किरकोळ विदेशी मद्य विक्री आणि किरकोळ देशी मद्य विक्री दुकानांच्या बाबतीत स्थलांतरासाठी यापुढे नोंदणीकृत सोसायटीची 'ना हरकत' घेणे बंधनकारक राहील आणि या निर्णयाची राज्यात सर्वत्र अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवा यांनी आज विधानसभेत दिली. Winter Session 2025: मद्यविक्रीसाठी आता सोसायटीची ‘ना हरकत’ बंधनकारक; अजित पवारांची माहिती 
  • 2025-12-10 20:08:18

    लाडकी बहिण योजनेतून 20,00,653 लाभार्थी अपात्र

    आज विधानमंडळात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' (CM Majhi Ladki Bahin Yojana) योजनेवर उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी उत्तर देत शासनाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी, लाडकी बहीण योजनेसाठी एकूण 2 कोटी 63 लाख 83 हजार 589 अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी 2 कोटी 43 लाख 82 हजार 936 अर्ज विभागाने पात्रतेनुसार ग्राह्य धरले. उर्वरित फॉर्म हे प्राथमिक पडताळणीतच अपात्र ठरले होते, अशी माहिती दिली. Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 20 लाख लाभार्थी अपात्र; E-KYC बाबत मंत्री तटकरेंची मोठी घोषणा
  • 2025-12-10 18:32:28

    2025-26 या वर्षातील पुरवणी मागण्यावर चर्चा सुरु

    2025-26 या वर्षातील पुरवणी मागण्यावर चर्चा सुरु
  • 2025-12-10 15:30:25

    Maharashtra Session News: 2026 पर्यंत एसटीला 8000 नवीन बसेस मिळणार - सरनाईक

    महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) 2026 पर्यंत 8000 नवीन बसेस खरेदी करेल, त्यापैकी 3000 वाहनांसाठी निविदा प्रक्रिया आधीच पूर्ण झाली आहे, असे राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी सांगितले. बस संघटनेला पूरक मागण्यांद्वारे 2,893 कोटी रुपये देखील मिळतील आणि त्यात कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी आणि त्यांच्या प्रलंबित थकबाकीसाठी तरतूद केलेली रक्कम समाविष्ट असेल, असे त्यांनी विधान परिषदेत सांगितले.
  • 2025-12-10 15:05:05

    वाईन शॉप, किरकोळ देशी मद्यविक्री दुकानांसाठी यापुढे सोसायटीची 'ना हरकत' बंधनकारक

    किरकोळ विदेशी मद्य विक्री आणि किरकोळ देशी मद्य विक्री दुकानांच्या बाबतीत स्थलांतरासाठी यापुढे नोंदणीकृत सोसायटीची 'ना हरकत' घेणे बंधनकारक राहील आणि या निर्णयाची राज्यात सर्वत्र अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली.
  • 2025-12-10 13:59:03

    इलेक्ट्रिक वाहनांकडून टोलवसुली 'बेकायदेशीर'; 8 दिवसांत माफी लागू करा

    प्रमुख महामार्गांवरील इलेक्ट्रिक वाहनांकडून टोलवसुली 'बेकायदेशीर'; 8 दिवसांत माफी लागू करा: महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष EV Toll Free: समृद्धी महामार्गावरील EV कडून टोलवसुली ‘बेकायदेशीर’, पैसे परत करण्याचे विधानसभा अध्यक्ष निर्देश
  • 2025-12-10 13:16:28

    Nagpur Winter Session 2025 Live Update: प्रकाश सुर्वे यांचा उदय सामंतांना घरचा आहेर

    मागाठाणे मतदारसंघातील झोपडपट्टीतील 50 घरे विकासकाशी संगनमत करून महापालिकेने तोडक कारवाई केली. यावरून शिंदेसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. यावर बोलताना प्रकाश सुर्वे यांनी विधानसभेत मंत्री उदय सामंत यांना चांगलाच टोला लगावला आहे. सविस्तर वाचा Winter Session 2025: ‘आमचे मंत्री थातूरमातूर उत्तर देतात ते गुगली टाकण्यात मास्टर’ शिंदेंच्या आमदारांचा मंत्र्यांना घरचा आहेर
  • 2025-12-10 12:25:30

    राज्य निवडणूक आयुक्तांना पदावरुन दूर करण्याचे अध्यक्षांना निवेदन

    Maharashtra State Election Commissioner: राज्य निवडणूक आयुक्तांना पदावरुन दूर करण्याचे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षांना निवेदन दिले आहे. यावर विधानसभा अध्यक्षांनी हा मुद्या सभागृहाच्या हद्दीतील नसल्याचे म्हणत हे निवेदन व प्रस्ताव फेटाळला. सविस्तर वाचा -
    Winter Session 2025: महाभियोग चालवून राज्य निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करण्याची नाना पटोलेंची मागणी, अध्यक्ष म्हणाले…
  • 2025-12-10 12:20:11

    Maharashtra Winter Session 2025: ‘शक्ती कायदा’ केंद्र सरकारने राज्याकडे परत पाठवला

    महाराष्ट्रात महिलांवरील वाढत्या अत्याचारांना रोखण्यासाठी तीन वर्षांपूर्वी महाविकास आघाडी आणि महायुती सरकारने आणलेला ‘शक्ती कायदा’ अखेर केंद्र सरकारने राज्याकडे परत पाठवला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली असून, राज्यात नव्याने शक्ती कायदा लागू करण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने शक्ती कायद्यांमधील तरतूद केंद्र सरकारने केलेल्या कायद्यात असल्याची माहिती देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या कायद्यात शिक्षा बाबत कठोर भूमिका असून नवीन कायद्याची गरज नसल्याचे केंद्राने राज्य सरकारला सांगितले आहे. सविस्तर वाचा - Shakti Law: उद्धव ठाकरे सरकारने मंजूर केलेला शक्ती कायदा केंद्राने परत पाठवला; देवेंद्र फडणवीस यांची माहिती
  • 2025-12-10 12:18:33

    महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी सुधारणा) विधेयक, 2025 मंजूर

    नागपुरात राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session 2025) सुरु आहे. यावेळी ऐतिहासिक तुकडेबंदी (Tukdebandi) कायद्यातील जाचक अटी शिथिल करणारे 'महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी सुधारणा) विधेयक, 2025' (Maharashtra Land Revenue Code Amendment Bill 2025) आज विधानसभेत मंजूर करण्यात आले. सविस्तर वाचा - Tukdebandi: ‘तुकडेबंदी’ शिथिल करणारे विधेयक विधानसभेत मंजूर; आता NA परवानगीची भासणार नाही गरज
  • 2025-12-10 12:14:32

    Winter Session 2025: मंत्री बावनकुळे यांनी विधानसभेत 4 शासकीय विधयके

    मंत्री बावनकुळे यांनी विधानसभेत 4 शासकीय विधयके सादर केली.