जेएनएन,पालघर:डहाणू तालुक्यातील सारणी, म्हसाड, दाभोण, ऐना, रणकोळ आणि उर्से या गावांमध्ये अलीकडील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालघर विधानसभा आमदार राजेंद्र गावित यांनी या गावांचा पाहणी दौरा करून शेतकऱ्यांची स्थिती जाणून घेतली.नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने मदत द्यावी अशी मागणी ही गावित यांनी केली.
या पाहणी दौऱ्यात आमदार गावित यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत प्रशासनाला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. “शेतकऱ्यांच्या संकटाच्या काळात शासन त्यांच्या पाठीशी ठाम उभे आहे. सर्वेक्षण करून नुकसानग्रस्तांना मदतीचा लाभ लवकरात लवकर मिळेल.” असे अशी माहिती गावित यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष पाहून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी त्वरित मदतीचा निर्धार केल्याने स्थानिकांमध्ये काहीसा दिलासा निर्माण झाला आहे असे आवाहन सरकारला केले आहे.
हेही वाचा: Ladki Bahin Yojana: ऑक्टोबर अन् नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट; लाभार्थी महिलांच्या खात्यात आचारसंहितेपूर्वीच जमा होणार 3000 रुपये?
