जेएनएन,नागपूर.Ganeshotsav 2025: शहरात सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी व गणेश स्थापनेचे औचित्य साधून सी.ए.रोड,महाल आणि चितारोळी परिसरात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेत आपली बस च्या मार्गात तात्पुरता बदल करण्यात आला आहे. या बदलाची प्रवाशांनी याची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन आपली बस प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.
बदललेले मार्ग खालीलप्रमाणे :
- मार्ग क्र. ४४ (आपली बस टर्मिनल ते कामठी, शांती नगर मार्गे): या बसचा मार्ग आता शारदा चौक - इंदोरा - एलआयसी मार्गे वळवण्यात आला आहे.
- मार्ग क्र. ३४८ (आपली बस टर्मिनल ते पंतप्रधान आवास योजना): हा मार्ग जगनाडे चौक - मॉडेल मिल - बस स्टँड मार्गे वळवण्यात आला आहे.
- मार्ग क्र. १६० (आपली बस टर्मिनल ते श्रीकृष्ण नगर): हा मार्ग जगनाडे चौक - मॉडेल मिल - बस स्टँड मार्गे वळवण्यात आला आहे.
- मार्ग क्र. १४१ (खराबी ते जैताळा): हा मार्ग जगनाडे चौक - मॉडेल मिल - बस स्टँड मार्गे वळवण्यात आला आहे.
- मार्ग क्र. ०१ (पारडी ते जैताळा): हा मार्ग जगनाडे चौक - मॉडेल मिल - बस स्टँड मार्गे वळवण्यात आला आहे.
हेही वाचा: Nagpur Traffic Diversion: गणेश चतुर्थीच्या निमित्ताने नागपुरात वाहतुकीत मोठा बदल, वाचा सविस्तर…