जेएनएन, नागपूर.Ganeshotsav 2025: आज सर्वत्र मोठ्या उत्साहात गणरायाचे आगमन झाले आहे. नागपूर महानगरपालिकेद्वारा श्री गणेशाच्या स्थापनेपासून तर, मूर्ती विसर्जनापर्यंत शहरातील नागरिकांकरिता विविध सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मनपातर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून, शहरात विविध ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत श्रीगणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी शहरातील 216 ठिकाणी 419 कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यंदा मोठ्या गणेश मूर्ती विसर्जनाची गोरेवाडा, कोराडी, कच्छीवीसा येथे सोय करण्यात आली आहे. तर शहरात सोनेगाव, गांधीबाग तलाव परिसरासह विविध ठिकाणी 419 कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे.
मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी नागरिकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करीत गणेश मूर्ती कृत्रिम विसर्जन तलावातच विसर्जित करावी असे आवाहन केले आहे. मनपाद्वारे एक व दीड दिवसीय गणेश विसर्जनासाठी विविध ठिकाणी 34 कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये लक्ष्मीनगर झोन येथे 3 ठिकाणी, धरमपेठ झोन येथे 7 ठिकाणी, हनुमाननगर झोन येथे 2 ठिकाणी आणि धंतोली झोन, नेहरूनगर झोन व सतरंजीपुरा झोन येथे प्रत्येकी एका ठिकाणी अशा एकूण 15 ठिकाणी 34 कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे.
याशिवाय तीन दिवसाच्या मूर्तीच्या विसर्जनाकरिता 37 कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये लक्ष्मीनगर झोनमध्ये 3 ठिकाणी, धरमपेठ झोन येथे 7 ठिकाणी, हनुमाननगर झोन येथे 5 ठिकाणी आणि धंतोली झोन, नेहरुनगर झोन, सतरंजीपूरा झोन येथे प्रत्येकी एक अशा 18 ठिकाणी एकूण 37 कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे.
तर पाच दिवसीय श्रीच्या मूर्ती विसर्जनासाठी 66 कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये लक्ष्मीनगर झोनमध्ये 3 ठिकाणी, धरमपेठ झोन येथे 13 ठिकाणी, हनुमाननगर झोन येथे 5 ठिकाणी आणि धंतोली झोन, नेहरुनगर झोन, सतरंजीपूरा झोन आणि आशीनगर झोनमध्ये प्रत्येकी 1 अशा 18 ठिकाणी एकूण 66 कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे.
सातव्या दिवसाच्या श्रीच्या मूर्ती विसर्जनासाठी 103 कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये लक्ष्मीनगर झोनमध्ये 4 ठिकाणी, धरमपेठ झोन येथे 24 ठिकाणी, हनुमाननगर झोन येथे 8 ठिकाणी आणि धंतोली झोन येथे २ ठिकाणी, नेहरुनगर झोन आणि आशीनगर झोन झोनमध्ये प्रत्येकी 1 अशा ४० ठिकाणी १०३ कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे.
तर नवव्या, दहाव्या आणि अकराव्या दिवशी गणपती विसर्जनासाठी 419 कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये लक्ष्मीनगर झोन येथे २० ठिकाणी धरमपेठ झोन येथे २४ ठिकाणी, हनुमान नगर झोन येथे ३६ ठिकाणी, धंतोली झोन येथे १९ ठिकाणी, नेहरुनगर झोन येथे ३० ठिकाणी गांधीबाग झोन येथे २८ ठिकाणी, सतरंजीपुरा झोन येथे १६ ठिकाणी, लकडगंज झोन १९ ठिकाणी, आशीनगर झोन येथे१२ ठिकाणी, मंगळवारी झोन येथे ११ ठिकाणी आणि कोराडी येथे १ अशा २१६ ठिकाणी ४१९ कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे.
हेही वाचा: Ganeshotsav 2025 Reel Contest: गणेशोत्सवानिमित्त सरकारकडून रील स्पर्धेचे आयोजन; विजेत्यास 1 लाख रुपये बक्षिस
