जेएनएन, नागपूर. Ganeshotsav 2025: श्री गणरायाचे आगमणासह पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकरिता नागपूर महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली झाली आहे. विशेष म्हणजे, गणपती बाप्पांच्या निर्माल्यापासून खत निर्मिती केली जाणार आहे. निर्माल्यापासून गांडूळ खत निर्माण करण्यात येणार असून, या खताचा वापर उद्यान/गार्डन मध्ये खत म्हणून वापर करण्यात येणार आहे. याद्वारे खतापासून उद्याने बहरणार आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांच्या हस्ते मंगळवारी (ता.२६) निर्माल्य रथांचे लोकार्पण करण्यात आले.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागपूर महानगरपालिका द्वारे दरवर्षी शहरातील विविध गणेश मंडळांमध्ये जमा असलेले निर्माल्य विशेष निर्माल्य कलशामध्ये संकलित केले जाते. दरवर्षी 10 झोनमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे 10 निर्माल्य रथांची व्यवस्था करण्यात येत होती. पण या रथांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता यावर्षी 9 अतिरिक्त रथ वाढविण्यात आले असून, यंदा दहा झोनमध्ये 19 निर्माल्य रथांची सेवा मिळणार आहे. यात ५ विद्युत ई- रथांचा देखील समावेश आहे. यात ए.जी. एन्व्हायरोच्या 12 व बीव्हीजी इंडियाच्या ७ वाहनचा समावेश आहे.
या निर्माल्य रथाद्वारे झोन निहाय सार्वजनिक गणेश मंडळाव्दारे स्थापन करण्यात आलेल्या श्री. गणेशाचे निर्माल्य श्रद्धापूर्वक संकलित केले जाईल व शास्त्रोक्त पद्धतीने त्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत निर्मिती केली जाणार आहे. निर्माल्यापासून खत निर्मितीसाठीसाठी मनपाने भांडेवाडी येथे व्यवस्था करण्यात आली आहे. घरगुती श्री गणेशाचे निर्माल्य नागरिकांनी त्यांच्या जवळच्या सार्वजनिक गणेश मंडळांकडे सुपूर्द करावे. मनपाचे स्वच्छता कर्मचारी ते निर्माल्य रथामध्ये संकलित करतील. यासाठी सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी आपल्या मंडपामध्ये निर्माल्य संकलन कलशाची व्यवस्था करण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
मागील वर्षी दहा दिवसात 187 टन निर्माल्य संकलित
मागील वर्षी गणेशोत्सवाच्या दहा दिवसत 187 टन निर्माल्या संकलित करण्यात आले होते. त्यापासून 18 टन खत तयार करण्यात आले होते. निर्माल्यापासून तयार करण्यात येणाऱ्या गांडूळ खतांचा वापर उद्यान/गार्डन मध्ये खत म्हणून वापर करण्यात येणार आहे.
निर्माल्य रथांसाठी टोल फ्री क्रमांक
नागपूर महानगरपालिकेद्वारे दहा झोनमध्ये 19 निर्माल्य रथांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निर्माल्य रथांची व्यवस्था एजी एन्व्हायरो आणि बीव्हीजी या एजन्सींद्वारे करण्यात आली आहे. दोन्ही एजन्सीद्वारे या रथांच्या व्यवस्थेसाठी टोल फ्री क्रमांक देखील जारी केले आहेत. लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमान नगर, धंतोली आणि नेहरू नगर झोनमध्ये एजी एन्व्हायरो एजन्सीद्वारे निर्माल्य रथांची व्यवस्था असून यासाठी 18002677966 हे टोल फ्री क्रमांक तर गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आशीनगर आणि मंगळवारी या झोनसाठी बीव्हीजी एजन्सीद्वारे 18002662101 हे टोल फ्री क्रमांक जारी करण्यात आले आहे.
हेही वाचा:Ganeshotsav 2025: मनपातर्फे ‘इको-फ्रेंडली गणेशोत्सव’ स्पर्धा, इको-फ्रेंडली अभियान अंतर्गत येथे करा नोंदणी