जेएनएन, गडचिरोली Gadchiroli Latest News: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 14,27,085 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,97,969 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी 13,02,873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची ही टक्केवारी 91.88 आहे. सर्व विभागीय मंडळांमधून कोकण विभागाचा निकाल 96.74 टक्के इतका सर्वाधिक आहे.
गडचिरोली जिल्ह्यातून शरयू ढोरे पहिली
गडचिरोली जिल्ह्यातून पहिली येण्याचा मान पटकावणारी शरयू विलास ढोरे हिचे सर्वत्र कौतूक केले जात आहे. शरयू विलास ढोरे हिला 92 टक्के मिळाले आहेत. शरयू हिने आपल्या यशाचे श्रेय महात्मा गांधी शाळा व ज्यू. सायन्स कॉलेज येथील शिक्षक तसेच आपल्या पालकांच्या मोलाच्या मार्गदर्शनाला दिले आहे.
हेही वाचा - Bhandara News: भंडाऱ्यात 'सीडबॉल महोत्सव', पर्यावरण संवर्धनासाठी 1 लाख सीडबॉल्स करणार वितरीत
जेनेटिक इंजीनियरिंग करण्याची केली इच्छा व्यक्त
मुलाखती दरम्यान, तिने आपल्या पुढील शिक्षणविषयी सांगताना जेनेटिक इंजीनियरिंग किंवा एम.एस.सी. ॲग्री करून बायोटेक्नॉलॉजी या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा व्यक्त केली. तिचा आत्मविश्वास व स्पष्ट विचारशक्तीचे कौतुक करण्यात येत आहे. शरयूच्या यशामागे कष्ट, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शन यांचे उत्तम उदाहरण पाहायला मिळते.