जेएनएन, नागपूर:  दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, दिनांक 21 ऑक्टोबर 2025 रोजी नागपूर मेट्रो सेवा संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहील. दिवाळीच्या दिवसांमध्ये प्रवाशांची संख्या कमी असल्याने हा निर्णय मेट्रोतर्फे घेण्यात आला आहे.

प्रवाशांची संख्या घटली

या दिवशी खापरी, प्रजापती नगर, ऑटोमोटिव्ह स्क्वेअर आणि लोकमान्य नगर या चारही टर्मिनल स्थानकांवरून शेवटची मेट्रो संध्याकाळी 6.00 वाजता निघेल. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास नागरिक घरामध्ये पूजेसाठी व्यस्त असतात, त्यामुळे प्रवाशांची संख्या कमी राहण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रवाशांनी कृपया त्यांचा प्रवास  मेट्रोच्या वेळेनुसार नियोजित करावा. जेणेकरून प्रवाश्यांना कुठल्याही समस्यांचा सामना करावा लागू नये.