जेएनएन, नागपूर. नागपुरात एक भयंक घटना समोर आली आहे. येथील गोधनी गावातील वॉटर ट्रीटमेंट प्लांट मधील 900 किलो क्षमतेच्या क्लोरीन गॅस सिलेंडर मधून क्लोरीन ची गळती झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी आणि एनडीआरएफ ची चमू तथा अग्निशमन विभागाच्या जवानांकडून परिसर रिकामा करण्यात आला आहे.
100 जणांना श्वास घेण्याच्या त्रास
नागपुर गोधणी परिसरात मध्यरात्री विषारी gas leak झाली आहे.परिसरातील नागरिकांना बाहेर काढण्यात आले असून, आज त्या भागात नागरिकांना जाण्यास बंदी करण्यात आली आहे. जलशुद्धीकरण केंद्रातील क्लोरिन गॅस गळती झाली आहे. श्वास घेण्याच्या त्रासामुळे 100 च्या जवळ नागरिकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण
पहाटे सुमारे एक वाजता आजूबाजूच्या वस्तीमध्ये गॅस पसरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गॅस गळतीमुळे अनेक लोकांना खोकला येऊन श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. पोलिसांच्या मदतीने आजूबाजूच्या वस्तीतील लोकांना दूर निघून जाण्यास सूचना दिल्या. काही लोकांना उपचारार्थ स्पर्श हॉस्पिटल झिंगाबाई टाकळी तसेच मेयो रुग्णालयात घालविण्यात आले.
मनपा अग्निशमन विभाग आपले दोन वॉटर टेंडर तसेच ब्रीदिंग ऍपरेटर्स सह घटनास्थळी दाखल झाले. मदतीला ओसीडब्ल्यू चे कर्मचारी तथा एनडीआरएफ ची चमू बोलविण्यात आली. पहाटे 5.30 च्या सुमारास वायू गळती कमी झाल्यावर क्लोरीन सिलेंडरला एनडीआरएफच्या चमू तथा अग्निशमन विभागाच्या जवानांच्या तसेच ओ सी डब्ल्यू चे कर्मचाऱ्यांच्या मदतीने कॉस्टिक सोडा मिश्रित पाण्याच्या टाकीमध्ये टाकण्यात आलेले आहे.
