जेएनएन, वर्धा. मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधु एकत्र येणार आहेत, अशी चर्चा आहे, असा प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज वर्धा येथे केला होता. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, कोणीही एकत्र आले तरी मुंबई महानगर पालिकेचा महापौर हा महायुतीचाच होणार आहे, हे मुंबईच्या लोकांंनी मनात ठाम केले आहे. त्यामुळे मुंबईत आमची सत्ता येईल, असा दावा फडणवीस यांनी केला.

वर्ध्यात मंथन बैठक

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या (local body election) पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची वर्धा येथील सेवाग्रामच्या चरखागृहात मंथन बैठक (BJP Meeting) पार पडली. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणनिती तयार करण्यात आली अशी माहिती फडणवीसांनी दिली. 

विदर्भात महायुती सोबत लढणार

विदर्भात महायुती म्हणुन स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक भाजप लढणार आहे, असं फडणवीस म्हणाले. महायुती हा नियम आहे, मात्र, मैत्रिपूर्ण लढत हा अपवाद आहे, असं फडणवीस म्हणाले. काही अडचणी असतील तर त्यावर योग्य वेळी तोडगा काढला जाईल, असंही फडणवीस म्हणाले.

मुंबई महानगर पालिकेचा महापौर हा महायुतीचाच

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधु एकत्र येणार आहेत, अशी चर्चा आहे, असा प्रश्न विचारला. यावेळी, कोणीही एकत्र आले तरी काही फरक पडत नाही. मुंबई महानगर पालिकेचा महापौर हा महायुतीचाच होणार आहे, हे मुंबईच्या जनतेने मनात ठाम केले आहे. त्यामुळे मुंबईत आमची सत्ता येईल, आम्हाला कोणासोबत लढायचे हे येता काळात स्पष्ट होईल, असं फडणवीस म्हणाले.