एजन्सी, नागपूर. Accident On Samruddhi Expressway: नागपुरात समृद्धी महामार्गावर पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर गाडीतील अन् सहा जण जखमी झाले आहेत. नागपूरजवळ कार महामार्गाच्या दुभाजकाला धडकल्यानं हा अपघात झाला.

लग्नावरुन परतताना अपघात

लग्न समारंभाला उपस्थित राहून गाडीतील सर्वजण नागपूरहून वाशिमला परतत होते, यावेळी मंगळवारी हा अपघात झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

एक महिला ठार

नागपूरजवळील Samruddhi Expressway वर कार रस्त्याच्या दुभाजकाला धडकल्याने एक महिला ठार तर सहा जण जखमी झाले. ही घटना हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

    जखमीवर नागपूर एम्समध्ये उपचार सुरु

    मृत व्यक्तीची ओळख पटली असून आशादेवी रमेशचंद्र लाहोटी (67) अशी या अपघातातील मृतक महिलेचे नाव आहे. जखमींमध्ये चालक रोहित लाहोटी (36) आणि त्यांची पत्नी तिलक (32) हे दोघेही वाशिमचे रहिवासी आहेत; रोशन लाहोटी (35), विठ्ठल राठी (45) लातूर; आणि दिनेश मलानी (38) आणि त्यांची पत्नी सुनीता अकोला येथील आहेत. सर्वांवर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नागपूर येथे उपचार सुरू आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

    गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात 

    वेणा नदीच्या पुलाच्या चौकात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला, असे त्यांनी सांगितले. प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.