जेएनएन, मुंबई. दावोसमधील झालेल्या कराराने महाराष्ट्र राज्याच्या विकासाला आणखीन गती देणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी केले आहे. ते काल दावोस येथे बोलत होते.

दावोसमध्ये पहिल्याच दिवशी 6,25,457 कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले आहे. यामुळे राज्यात 1 लाख रोजगार निर्मिती होणार आहे. पहिला दिवशी झालेल्या करारमध्ये गडचिरोली जिल्हाचा समावेश करण्यात आला आहे. तर नागपूरसाठी जेएसडब्ल्यूशी 3 लाख कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला आहे.

या करारने स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स इत्यादी क्षेत्रात रोजगार आणि विकासाला गती मिळणार आहे.

दावोसमधील झालेले करार महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट देणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Chief Minister On Davos) केले आहे. दावोस फोरम महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. दावोसमध्ये बाहेर बर्फ पडतो आहे. पण, आतमध्ये गुंतवणुकीचा ओघ येत असल्याने गर्मी आहे.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ची प्रक्रिया अतिशय वेगवान आणि तितकीच सहजसोपी प्रक्रिया केली आहे. गुंतवणूकदारांच्या बाहेर मोठ्या रांगा लागल्या आहेत. महाराष्ट्रात एकदा याल तर पुन्हा तुम्ही बाहेर जाणार नाही असा विश्वास फडणवीस यांनी गुंतवणूकदाराला दिला आहे.

    कल्याणी समूहासोबत संरक्षण, स्टील, ईव्ही क्षेत्रासाठी हा करार झाला आहे. यामध्ये गुंतवणूक 5200 कोटी रुपयांची असून 4000 रोजगार निर्मिती होणार आहे.

    आतापर्यंत सामंजस्य करार हे कल्याणी समूह, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, बालासोर अलॉय लि., विराज प्रोफाईल्स प्रा. लि., एबी इनबेव, जेएसडब्ल्यू, वारी एनर्जी, टेम्बो, एलमाँट, ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी, अवनी पॉवर बॅटरिज, जेन्सॉल, बिसलरी इंटरनॅशनल, एच टू पॉवर, झेड आर टू, ब्ल्यू एनर्जी मोटर्स, इस्सार, बुक माय शो, वेल्स्पून इत्यादी कंपन्यांचा समावेश आहे.

    लॉजिस्टिक, ऑटोमोबाईल्स, स्टील, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, पायाभूत सुविधा, करमणूक, हरित ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन आदी क्षेत्रातील हे करार आहेत.