जेएनएन, मुंबई: Maharashtra ZP Election 2026 Date: राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेऊन मतदानांच्या तारखांची माहिती दिली.

12 ZP निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, संभाजीनगर
परभणी धाराशीव, लातूर या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणूक होणार आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली. 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

आचारसंहिता लागू

निवडणुका जाहीर झालेल्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाल्याची माहिती यावेळी आयुक्तांनी दिली.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम

    • 16 जानेवारी -अर्ज दाखल
    • 21 जानेवारी -अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख
    • 22 - अर्ज छाननी
    • 27 - उमेदवारी माघार
    • 27 जानेवारी - चिन्ह वाटप अंतिम उमेदवार यादी
    • 5 फेब्रुवारी - मतदान
    • 7 फेब्रुवारी - मतमोजणी

    हेही वाचा - Devendra Fadnavis on Adani: मोदी सत्तेवर आल्यानंतरच अदानी इतके श्रीमंत कसे झाले? फडणवीसांनी  दिलं राज ठाकरेंच्या प्रश्नाचं उत्तर