जेएनएन, मुंबई. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' (Ladki Bahin Yojana) योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. योजनेचा मासिक हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करणे अनिवार्य आहे. फक्त ई-केवायसी यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिलांनाच योजनेचा लाभ नियमितपणे मिळणार आहे. तसेच ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर काही महिलांना 6000 रुपये मिळण्याची शक्यता आहेत.
अनेक महिलांच्या ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक चुका किंवा चुकीचे पर्याय निवडले गेल्याने लाभ रखडला आहे किंवा थांबला आहे. अशा महिलांसाठी सरकारने ऑनलाइन पोर्टलद्वारे दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही दुरुस्ती आता ऑनलाइन पद्धतीने करता येईल. यापूर्वी अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी करण्याची योजना होती, पण आता ती रद्द करण्यात आली आहे आणि ऑनलाइन प्रक्रियेवर भर देण्यात आला आहे.
6000 एकाच वेळी खात्यात जमा होणार
ज्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण केले नाही किंवा त्यात त्रुटी असल्याने डिसेंबर 2025 पासून त्यांचा लाभ थांबला आहे. त्यांना प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रलंबित हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, 4 महिन्यांचे हप्ते असल्यास सुमारे 6000 एकाच वेळी खात्यात जमा होऊ शकतात, अशी माहिती आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीची मुदत वाढवली
ई-केवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2026 आहे, अशी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी घोषणा केली होती. ही मुदत डिसेंबर 2025 नंतर वाढवण्यात आली आहे. या तारखेनंतर दुरुस्तीची कोणतीही संधी मिळणार नाही आणि लाभ कायमचा थांबू शकतो.
ladakibahin.maharashtra.gov.in वर केवायसी करा
लवकरात लवकर अधिकृत पोर्टल ladakibahin.maharashtra.gov.in किंवा ई-केवायसी विभागावर जा. आपली माहिती तपासा आणि चुका (उदा. आधार लिंक, पर्याय निवड, इ.) दुरुस्त करा. सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे द्या जेणेकरून भविष्यात अडचणी येणार नाहीत. प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर स्टेटस तपासा आणि पावती/कन्फर्मेशन सेव्ह करा. या संधीचा फायदा घ्या आणि योजनेचा लाभ नियमित मिळवा! अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट किंवा हेल्पलाइनचा संपर्क साधा.
