जेएनएन, मुंबई. महाराष्ट्र शासनाने 2026 या वर्षासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी 24 सार्वजनिक सुट्ट्या (Maharashtra Government Holiday List 2026) जाहीर केलेल्या आहेत.
मार्च महिन्यातील सुट्ट्या (March Month Holiday List)
त्यानुसार मार्च महिन्यात होळी (रंगपंचमी) 3 मार्च ,गुढीपाडवा 19 मार्च, रमझान ईद 21 मार्च, रामनवमी - 26 मार्च आणि महावीर जयंती - 31 मार्च रोजी सार्वजनिक सुट्टी आहे.
धुलीवंदनची सार्वजनिक सुट्टी कधी?
महाराष्ट्रात होळी हा सण 2 मार्च रोजी साजरा करण्यात येणार आहे. आणि 3 मार्च रोजी रंगपंचमी किंवा धुलीवंदन साजरा होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 3 मार्च रोजी सार्वजनिक सुट्टी आहे.
तसंच, सध्या महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. तीन मार्च रोजी अधिवेशनालाही सुट्टी जाहीर करण्यात आले आहे. या दिवशी कामकाज बंद राहिल.
जाहीर केलेल्या सुट्ट्यांमध्ये प्रमुख सण आणि राष्ट्रीय दिवसांचा समावेश आहे. या सुट्या महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालये, राज्य शासनाचे उपक्रम, महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती यांना लागू राहील.
महाराष्ट्रातील शासकीय सार्वजनिक सुट्ट्यांची लिस्ट (Maharashtra Government Holiday List 2026)
- होळी (दुसरा दिवस) - 3 मार्च 2026, मंगळवार
- गुढीपाडवा - 19 मार्च 2026, गुरुवार
- रमझान ईद - 21 मार्च 2026, शनिवार
- रामनवमी - 26 मार्च 2026, गुरुवार
- महावीर जयंती - 31 मार्च 2026, मंगळवार
- गुड फ्रायडे - 3 एप्रिल 2026, शुक्रवार
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती - 14 एप्रिल 2026, मंगळवार
- महाराष्ट्र दिन - 1 मे 2026, शुक्रवार
- बुद्ध पौर्णिमा - 1 मे 2026, शुक्रवार
- बकरी ईद - 28 मे 2026, गुरुवार
- मोहरम - 26 जून 2026, शुक्रवार
- स्वातंत्र्य दिन - 15 ऑगस्ट 2026, शनिवार
- पारशी नववर्ष दिन - 15 ऑगस्ट 2026, शनिवार
- ईद ए मिलाद - 26 ऑगस्ट 2026,बुधवार
- गणेश चतुर्थी - 14 सप्टेंबर 2026, सोमवार
- महात्मा गांधी जयंती - 2 ऑक्टोबर, 2026 शुक्रवार
- दसरा - 20 ऑक्टोबर 2026,मंगळवार
- दिवाळी (लक्ष्मीपूजन) - 8 नोव्हेंबर 2026, रविवार
- दिवाळी (बलिप्रतिपदा) - 10 नोव्हेंबर 2026, मंगळवार
- गुरुनानक जयंती 24 नोव्हेंबर 2026, मंगळवार
- ख्रिसमस - 25 डिसेंबर 2026, शुक्रवार
- भाऊबीजेची अतिरिक्त सार्वजनिक सुट्टी
राज्य सरकारने भाऊबीजेला म्हणजे 11 नोव्हेंबर 2026 रोजी अतिरिक्त सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.
