जेएनएन, नवी दिल्ली. 2026 मधील मार्च हा महिना सुरु होण्यास चार दिवसांचा वेळ बाकी आहे. मार्च महिन्यात होळी आणि इतर सण असल्यानं देशभरात सार्वजनिक सुट्टी असेल. काही सुट्ट्या या देशभरात लागू असतील तर काही सुट्ट्या राज्य पातळीवर लागू असतील. वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँका वेगवेगळ्या दिवशी सुरु राहतील. बँकांच्या सुट्ट्यांचं वेळापत्रक पाहून तुम्ही तुमच्या आर्थिक नियोजनाची सुरुवात केली पाहिजे.
मार्च महिन्यात होळी, रंगपंचमी, गुढीपाडवा, रमजान ईद, श्रीराम नवमी यासारखे सण असल्यानं बँका किती दिवस बंद राहणार आहेत. ते जाणून घेऊया. तसंच, मार्च महिन्यात सलग सुट्टी राहणार आहे. मार्चमध्ये जोडून सुट्ट्या आल्यानं तुम्ही मित्र आणि कुटुंबीयांना वेळ देऊ शकता, त्यांच्यासोबत पर्यटनाचा प्लॅन देखील करु शकता.
भारतात राष्ट्रीय सुट्टी असल्यास ती संपूर्ण राज्यांमध्ये लागू असते. काही प्रादेशिक पातळीवरील सुट्ट्या असतात त्या राज्यात लागू असतात.
मार्च महिन्यातील सार्वजनिक आणि बँक सुट्ट्यांची यादी
- 3 मार्च : धूलिवंदन
- 19 मार्च : गुढीपाडवा
- 21 मार्च : रमजान ईद
- 26 मार्च : श्रीराम नवमी
- 31 मार्च : भगवान महावीर जयंती
याशिवाय बँका रविवार म्हणजेच 1 मार्च, 8 मार्च, 15 मार्च, 22 मार्च, 29 मार्च या दिवशी बंद राहतील. दुसरा अन् चौथा शनिवार म्हणजेच 14 आणि 28 मार्चला देखील बँका बंद राहणार आहेत.
हेही वाचा - सरकारचा मोठा निर्णय; 31 लाख लोकांच्या EPF खात्यात जमा होणार 11000 कोटींचा रिफंड! कारण आहे काय?
मार्च महिन्यात अनेक सुट्ट्या आहेत, काही धार्मिक उत्सव देखील आहेत. याशिवाय होळी सारखा देशभर साजरा होणारा सण आहे. राष्ट्रीय आणि प्रादेशिक म्हणजेच राज्य स्तरावर वेगवेगळ्या दिवशी बँकांना सुट्ट्या राहतील. बँकांना कधी सुट्टी असेल याची माहिती घेऊन आर्थिक नियोजन करावं.
