जेएनएन, मुंबई: राज्यात नगरपरिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. यातच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.

‘मालवणात भाजपाच्या थैल्याना बॅगेने उत्तर!’

संजय राऊतांनी हा व्हिडिओ शेअर करताना मालवणात भाजपाच्या थैल्याना बॅगेने उत्तर! असं म्हणतं भाजपा आणि शिंदे गटावर निशाणा साधला आहे. या व्हिडिओत एकनाथ शिंदे हे हेलिकॉप्टरमधून उतरताना दिसत आहेत. त्याच्या स्वागतासाठी निलेश राणे हे तिथे उपस्थित होते. 

संजय राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, 

‘शिंदे मालवणात आले 

येताना बॅगेतून काय आणले?

    मालवणात भाजपाच्या थैल्याना बॅगेने उत्तर!

    या आधी नाशिक मध्ये ही बॅगा उतरल्याच होत्या 

    लोकशाही ची ऐशी की तैशी?

    जय महाराष्ट्र!’

    राजकारणात एकच खळबळ

    या ट्वीटमध्ये त्यांनी भारतीय निवडणूक आयोग आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे. संजय राऊत यांनी शेअर केलेल्या व्हिडिओने राजकारणात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे.