जेएनएन, मुंबई: मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास अधिक सुकर आणि जलद होणार आहे. याबाबत पश्चिम रेल्वेकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांत पश्चिम रेल्वेने तब्बल 15 ठिकाणी वेगमर्यादा हटवले आहेत. यामुळे लोकल गाड्या पूर्वीपेक्षा अधिक वेगाने धावणार असून प्रवासाचा कालावधी कमी होणार आहे.

वेगमर्यादा शिथिल होण्याचे कारण!
गोरेगाव ते कांदिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेचं काम ऑक्टोबर 2024 पासून सुरू असल्याने त्या भागात वेगमर्यादा लागू करण्यात आली होती. हे काम पूर्ण झाल्याने आता संबंधित मार्गावरील वेगमर्यादा शिथिल करण्यात आली आहे.

2023-24 मध्ये हटवलेल्या वेगमर्यादा !

खार – सांताक्रूझ 

सांताक्रूझ – विलेपार्ले 

सांताक्रूझ – खार

    2024-25 मध्ये हटवलेल्या वेगमर्यादा!

    1. माटुंगा रोड ते  माहीम मार्ग

    2. माहीम ते वांद्रे

    3. वांद्रे टर्मिनस ते सांताक्रूझ

    4. अंधेरी यार्ड परिसर 

    5. सांताक्रूझ ते वांद्रे 

    6. वांद्रे ते माहीम 

    7. जोगेश्वरी ते गोरेगाव 

    असा होणार फायदा !
    लोकल गाड्यांचा वेग वाढल्यामुळे प्रवास वेळेत बचत होईल.
    दैनंदिन प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांचा ताण कमी होईल.
    गर्दीच्या वेळी गाड्यांची आवर्तनं अधिक सुरळीत करता येतील.

    या दरम्यान रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की, मूलभूत सुविधांच्या कामानंतर जिथे शक्य असेल तिथे वेगमर्यादा हटवून लोकल प्रवास अधिक जलद आणि आरामदायी केला जाणार आहे.

    हेही वाचा: "नाफेड परत जा"! पोळ्याच्या दिवशी बैलांनाच बनवले आंदोलनाचे माध्यम, नाशिकच्या शेतकऱ्याचा अनोखा निषेध