जेएनएन, मुंबई. Maharashtra News: एप्रिल महिन्यातच पाण्याचे संकट राज्यावर दिसायला सुरू झाले आहे. उन्हामुळे राज्यात पाणीसंकट वाढतच चालला आहे. राज्यातील धरणांमध्ये 38 टक्के पाणीसाठा शिल्लक राहील आहे. मे आणि जून महिन्यात पाणीसाठा अजून कमी होणार आहे. वाढत्या उन्हामुळे पाणीसाठा कमी होत असून ग्रामीण आणि शहरीभागाला पाण्याची मोठी झळ बसणार आहे.
धरणातील जलसाठा कमी झाल्याने शहरी भागात पाणी कपात सुरू असून भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणात पाणी कपात होणार आहे. मागीलवर्षी सरासरीहून अधिक पाऊस पडूनही यंदा मात्र एप्रिल महिन्यातच जनतेच्या घशाला कोरडं पडली आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
पाणीसाठाची एकूण स्थिति!
महाराष्ट्रात एकूण 2 हजार 997 धरणं आहेत. धरणाची एकूण साठवणूक क्षमता 40 हजार 498 दशलक्ष घनमीटर आहेत. यावेळी आजमितीस धरणांमध्ये फक्त 38 टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. गेल्या 15 दिवसांत जलसाठ्यात 5 टक्क्यांनी घट झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात 10 ते 12 टक्के जलसाठा घटला आहे. पुणे विभागात सर्वात कमी म्हणजेच केवळ 30 टक्के पाणीसाठा आहे.कोकणामध्ये 44.37 %, पुण्यामध्ये 30%, नाशिकमध्ये 40%, मराठवाड्यामध्ये 35.82%, अमरावतीमध्ये 46%, नागपूरमध्ये 37.55% पाणीसाठी शिल्लक आहे. सध्या राज्यातील 17 जिल्ह्यांमधील 447 गावं आणि 1327 पाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
पाणी जपून वापरण्याचं आवाहन!
राज्य सरकारने शहरी आणि ग्रामीण भागातील नागरीकला पाणी संकटमुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा एप्रिल महिन्यातील पाणीसाठ्याची परिस्थिती चांगली आहे. मात्र वाढत्या उष्णतेमुळे पाणीसाठयात अधिकच घट होत आहे. घटत्या पाणीसाठीमुळे राज्य सरकार आणि नागरिकांची चिंता वाढली आहे.