जेएनएन, मुंबई. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Election) गेल्या चार ते पाच वर्षांपासून विविध कारणांमुळे लांबणीवर पडल्या आहेत. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तसेच इतर अनेक कारणांमुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मुदतवाढीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडे अर्ज दाखल केला होता. त्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्यासाठी 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ मंजूर केली आहे.

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेल्या मुदत वाढीनंतर आता निवडणूक आयोग कसून निवडणुकांच्या तयारी साठी लागला आहे. आयोगाकडून याद्या तयार करणे, प्रभाग रचना आणि प्रशासकीय पातळीवरील कामे सुरु आहेत. यातच आता सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये एक दावा करण्यात येत आहे.

व्हायरल फोटोतील दावा

सोशल मीडियावर होत असलेल्या फोटोमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-2025 (BMC elections 2025) प्रभागनिहाय आरक्षणाच्या अनुषंगाने शासनाकडून कोणत्याही स्वरूपाची सोडत किंवा त्याबाबतची अधिसूचना जाहीर केली आहे. 

महानगर पालिकेचे स्पष्टीकरण 

    व्हायरल होत असलेल्या फोटोमधील दाव्यावर बीएमसीने स्षटीकरण दिले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-2025 प्रभागनिहाय आरक्षणाच्या अनुषंगाने शासनाकडून कोणत्याही स्वरूपाची सोडत किंवा त्याबाबतची अधिसूचना जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या अशा स्वरूपाच्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन बीएमसीने केले आहे.