मुंबई. Uddhav Thackeray Raj Thackeray alliance : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची पुन्हा भेट घेतली आहे. ही भेट सार्वजनिक किंवा सण-समारंभाची नाही तर मुंबई महानगरपालिका निवडणूकच्या युतीसंबंधित धोरणांवर झाली आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी दिली आहे.
याआधी दोन्ही नेते गेल्या महिन्यांत भेटले होते. या भेटीत एकत्रित मोर्चा आणि बीएमसी निवडणूक सहित स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर चर्चा केली गेली. विशेष म्हणजे, यापूर्वी दोन दशकांपासून वेगळे चालणारे बंधू एकत्र आल्याने राज्यातील राजकीय समीकरण बदलू लागले आहे. सोबतच दोन पक्षांमध्ये स्नेह व राजकीय सामंजस्याचे संकेत दिसू लागले आहेत. 
राज ठाकरेंना 70 जागांची ऑफर! -
ठाकरे बंधुंनी मराठी अस्मिता आणि “हिंदी सक्ती” विरोधात एकत्र आवाज उठवला होता. त्यामुळे शिवसेना (UBT) मनसे (MNS) युतीची शक्यता वाढली. राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे निर्देश दिले आहेत. मतदार यादी, उमेदवारांची पसंती, वॉर्ड निवड अशी तयारीला गती देण्यात आली आहे.शिवसेना (UBT) पक्षाने देखील 227 वॉर्डमध्ये प्रत्येक जागेबाबत निरीक्षण सुरू असल्याचे म्हटले आहे, ज्यामध्ये मनसेची भूमिका महत्त्वाची राहील. UBT कडून राज ठाकरे यांना 70 जागां ऑफर देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
निकालावर होणारा परिणाम!
शिवसेना (UBT) आणि मनसे (MNS) युती झाली, तर मुंबईतील मराठी मतदारांचा मतदान समन्वय आणि स्थानिक प्रशासकीय व सामाजिक मुद्द्यांवर एकत्रित लढा उभा करणे शक्य होणार आहे.
