जेएनएन, मुंबई. Uber Service : मुंबईसह अनेक राज्यांमध्ये टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या उबर कंपनीवर गंभीर आरोप झाले आहेत. दिल्ली वगळता महाराष्ट्रातील कुठल्याही शहरात उबर शटलला परवानगी नाही, अशी माहिती उबरचे अधिकारी आकाश अग्रवाल यांनी दिली आहे. मुंबईत सरकारच्या परवानगी शिवाय उबर शटल जोमाने धावत आहे.
मुंबई उबर शटल (Uber Services in Mumbai) प्रति व्यक्ती 150 ते 200 रुपये प्रति राईड घेत आहे. राज्यात उबर शटलमुळे प्रवासी सुरक्षाचा विषय ऐरणीवर आला आहे काही आठवड्यांपूर्वी उबरने मुंबईत इतर शहरांच्या धर्तीवर शटल बस सेवा सुरू केली आहे. या सेवेअंतर्गत उबरच्या मोबाइल अॅपद्वारे बुकिंग करून प्रवाशांना त्यांच्या गंतव्य ठिकाणी पोहचवले जात आहे. मात्र, या सेवेबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. उबरने मुंबईत ही शटल बस सेवा सुरू करण्यासाठी महाराष्ट्राच्या परिवहन विभागाकडून कोणतीही परवानगी घेतलेली नाही. परवानगीशिवाय गेल्या कित्येक महिन्यापासून या बस मुंबईच्या रस्त्यांवर कशा चालू शकतात असा सवाल उपस्थित झाला आहे.
बिनपरवाना धावणाऱ्या शटल बसबाबत तक्रार!
नवी मुंबईतील प्रवासीने सांगितले की गेल्या काही दिवसांपासून उबरच्या शटल बस नवी मुंबईतील विविध भागांमध्ये प्रवाशांना 1 ते 10 किमीच्या अंतरासाठी किमान 90 रुपये आकारून सेवा देत आहेत. बेलापुर ते मंत्रालयाकडे जाण्यासाठी बस बुक केली असता, त्यांनी ड्रायव्हरकडे परिवहन विभागाचा परवाना विचारला. मात्र, ड्रायव्हरने परवाना दाखवण्यास टाळाटाळ केली.
मुंबईतील विनापरवाना उबर शटल बससेवेबाबत काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी विधीमंडळात प्रश्न उपस्थित केला.@NANA_PATOLE #uber #Ubershuttlebuses #uberbusservice pic.twitter.com/N1frTcS2KK
— SHRIKANT LONDHE (@shrikantalondhe) July 7, 2025
उबरने परवानगी घेतली नाही!
मराठी जागरणने उबरच्या सेफ्टी ऑफिसर आकाश अग्रवाल यांना जेव्हा याबाबत विचारले गेले, तेव्हा त्यांनीदिल्ली सोडून कुठेही परवानगी घेतली नाही. मुंबईत उबर शटल चालविण्यासाठी कुठलीही परवानगी घेतली नाही, अशी माहिती अग्रवाल यांनी दिली आहे.
सामान्य लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न - नाना पटोले
उबरची शटल बस सेवा मुंबईत विना परवानगी सुरू असल्याच्या मुद्याकडे लक्ष वेधताना काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटले की, मुंबईत उबरची सेवा सरकारची मंजुरी न घेताच सुरू आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून यामुळे सरकारचे महसूलही बुडाले आहे. उबरकडून लोकांकडून मोठी रक्कम तिकीटाच्या रुपात घेतली जात आहे, याकडे सरकारने लक्ष द्यावे. नाना पटोलेंच्या प्रश्नावर सरकारकडून मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले.