एजन्सी, ठाणे: ठाणे जिल्ह्यातील एक बालसुधारगृहात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील 14 वर्षीय कैदी मुलीवर दोन किशोरवयीन मुलींनी कथित लैंगिक अत्याचार केला आहे. या आरोपाखाली पोलिसांनी ठाणे जिल्ह्यातील सरकारी निरीक्षण गृहातील दोन किशोरवयीन मुलींना ताब्यात घेतले आहे, असे एका अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले.
ही कथित घटना 2 आणि 3 डिसेंबरच्या मध्यरात्री उल्हासनगरमधील निरीक्षण गृह/बालगृहात घडली.
गुन्हा दाखल
5 डिसेंबर रोजी भारतीय न्याय संहिताच्या कलम 64(1) (बलात्कार), 70(2) (गँगरेप) आणि 3(5) (सामान्य हेतू) आणि पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला. पुण्यातील 14 वर्षांची पीडित मुलगी देखील या बालसुधारगृहात कैदी आहे.
दोन्ही आरोपी मुलींना ताब्यात घेतले
"15 आणि 17 वर्षांच्या दोन्ही आरोपी मुलींना ताब्यात घेण्यात आले आहे आणि भिवंडी येथील बाल न्यायालयाच्या निर्देशांनुसार कारवाई करण्यात आली आहे," असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आणि पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले.
