जेएनएन,तुळजापूर: तुळजाभवानी देवस्थानाशी संबंधित पुजारी मंडळ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये थेट आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे.तर हा मुद्दा धर्मादाय आयुक्तांपर्यंत पोहोचला आहे. माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी विद्यमान विश्वस्त मंडळावर गंभीर आरोप केले आहेत. मंडळ स्थापनेचा मूळ उद्देश विसरून भ्रष्टाचाराचा अड्डा तयार झाला असल्याचा आरोप केला आहे.

विश्वस्तांनी न्यासाच्या प्रॉपर्टीकडे केलेल्या दुर्लक्षामुळे मोठे नुकसान झाल्याचे गंगणे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.याबाबत लेखी तक्रार धर्मादाय आयुक्तांकडे दाखल करून विद्यमान विश्वस्त मंडळाला तात्काळ बडतर्फ किंवा निलंबित करण्याची मागणी केली आहे.

विद्यमान अध्यक्षांचे प्रत्युत्तर!
विद्यमान अध्यक्षांनी सर्व आरोप फेटाळले असून, “यामागचे बोलविते धनी कोण आहेत, हे लवकरच समोर आणू” असे प्रत्युत्तर दिले आहे.

तक्रारींच्या मागे वैयक्तिक स्वार्थ व राजकीय हेतू असल्याचा आरोप केला आहे 

मंडळाचे काम पारदर्शक पद्धतीने चालते, असेही त्यांनी सांगितले.

तक्रारीला इतर पुजाऱ्यांचा पाठिंबा!
माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांच्यासोबत इतर काही पुजाऱ्यांनीही या तक्रारीला पाठिंबा दिला आहे.

    सध्याच्या मंडळाच्या कार्यपद्धतीमुळे देवस्थानाच्या नावाला काळिमा लागत असल्याचा आरोप इतर ही पुजारीने केला आहे.