जेएनएन, मुंबई. मुंबई ते नवी मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी सेवा सुरू होणार असून ही सेवा 22 सप्टेंबरपासून प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे.

प्रवासाचा कालावधी व खर्च! 

गेटवे ऑफ इंडिया ते नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (JNPT) पर्यंतचा प्रवास केवळ 30 मिनिटांत पूर्ण होईल. या प्रवासासाठी प्रवाशांना फक्त 200 रुपये इतका भाडा द्यावा लागणार आहे.

मुंबईहून नवी मुंबईला जाण्यासाठी प्रवाशांना रस्ते किंवा रेल्वे यांवर अवलंबून राहावे लागत होते. यामुळे मोठा वाहतूक कोंडीचा त्रास आणि जास्त वेळ लागत होता. नेहमी हा प्रवास एक तास किंवा त्याहून अधिक वेळेत पूर्ण होत होता. 

ई-वॉटर टॅक्सीची वैशिष्ट्ये!

  • ही टॅक्सी सेवा अरबी समुद्रातून प्रवास करेल.
  • गेटवे ऑफ इंडिया ते JNPT दरम्यान धावणाऱ्या टॅक्सींपैकी एक टॅक्सी सौरऊर्जेवर चालेल तर दुसरी वीजवर चालेल.
  • प्रत्येक टॅक्सीची प्रवासी क्षमता 20 प्रवाशांची असणार आहे.
  • या सेवेमुळे प्रवाशांना वेग, वेळेची बचत आणि आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

प्रवाशांसाठी फायदे!

    • रस्ते आणि रेल्वेवरील ताण कमी करण्यासाठी हा प्रवास सुखाचा ठरणार आहे.
    • मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानचा प्रवास सोपा, जलद आणि आरामदायी होणार आहे.
    • वेळेची बचत होऊन प्रवाशांना दैनंदिन प्रवासात मोठा दिलासा मिळणार आहे.

    हेही वाचा - Maharashtra News: जनसुरक्षा विधेयकाविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांचे उद्या राज्यभर आंदोलन