जेएनएन, मुंबई. Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. गोव्यावरून सहलीवरून परताना हसत्या-खेळत्या कुटुंबावर काळाचा घाला ओढवला आहे. महामार्गावरील एका कार अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा जागीच चक्काचूर झाला आहे.
लांजा विश्रामगृहाजवळ, गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या एका चारचाकी वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला मागून धडक दिली. या अपघातात दोन महिला आणि एका मुलासह तिघे जण जागीच ठार झाले.
तिघेही एकाच कुटुंबातील
यातील अन्य दोन प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्वजण मुंबईतील आग्रीपाडा येथील एकाच कुटुंबातील सदस्य होते आणि गोव्याची सहल करून परतत होते.
Lanja, Maharashtra: Three people, including two women and a boy, were killed after a four-wheeler travelling from Goa to Mumbai rammed into a parked dumper from behind near the Lanja Rest House on the Mumbai-Goa Highway. Two other occupants sustained critical injuries and were… pic.twitter.com/EpMRGP5ue4
— IANS (@ians_india) July 15, 2026
हेही वाचा - Nashik Accident: नाशिकमध्ये तीन वाहनांचा भीषण अपघात; 4 जण ठार, कार चक्काचूर
