जेएनएन, मुंबई: राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आयकर अपीलीय न्यायाधिकरणाने (Income Tax Appellate Tribunal - ITAT) 32 कोटी रुपयांच्या कथित अघोषित उत्पन्नासंदर्भातील दावा फेटाळून लावला आहे. तसेच या प्रकरणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील कारवाईही रद्द करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण? 

आयकर विभागाने काही व्यवहारांच्या आधारे मोठ्या रकमेचे उत्पन्न जाहीर न केल्याचा आरोप करत तपास सुरू केला होता. या तपासात सुमारे 32 कोटी रुपयांचे अघोषित उत्पन्न असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानुसार संबंधितांवर कर आणि दंडाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती.

ITAT चा निर्णय काय? 

ITATने सुनावणीदरम्यान सादर केलेले पुरावे, व्यवहारांची कागदपत्रे आणि आर्थिक नोंदींचा सखोल अभ्यास केला. त्यानंतर 

अघोषित उत्पन्नाचा दावा पुराव्याअभावी टिकू शकत नाही असे स्पष्ट केले. व्यवहारांमध्ये कोणतीही ठोस अनियमितता आढळली नसल्याचे नमूद केले.त्यामुळे संपूर्ण करआकारणी आणि दंडात्मक कारवाई रद्द केली.

    पवार कुटुंबासाठी दिलासा

    या निर्णयामुळे सुनेत्रा पवार आणि दिवंगत नेते अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दीर्घकाळ सुरू असलेल्या या प्रकरणात न्यायाधिकरणाने दिलेल्या निर्णयामुळे राजकीय आणि कायदेशीर स्तरावरही या प्रकरणाला महत्त्व प्राप्त झाले आहे.या निर्णयानंतर आयकर विभाग उच्च न्यायालयात दाद मागणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.