जेएनएन, मुंबई. राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनामध्ये ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करण्यासाठी आता अवघे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. ज्यांनी अद्याप प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्या लाभार्थींनी तातडीने ती पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मार्च महिन्याचा ₹1500 हप्ता कधी?
योजनेअंतर्गत मार्च महिन्याचा ₹1500 चा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- ई-केवायसी पूर्ण केलेल्या महिलांच्या खात्यातच रक्कम जमा होणार
- प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एप्रिल अखेर किंवा मेच्या सुरुवातीला पैसे येण्याची शक्यता आहे
- अपूर्ण केवायसीमुळे अनेक महिलांचे पैसे अडकू शकतात
किती महिलांवर परिणाम?
राज्यातील लाखो महिलांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नसल्याने त्या अपात्र ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
ई-केवायसी का महत्त्वाची?
- लाभार्थीची ओळख पडताळणी
- थेट बँक खात्यात पैसे जमा होण्यासाठी आवश्यक
- बनावट लाभार्थी रोखण्यासाठी उपाय
KYC कशी करावी?
- जवळच्या सेवा केंद्रात किंवा ऑनलाइन ई-केवायसी पूर्ण करावी
- आधार आणि बँक खाते लिंक तपासावे
- मोबाईल नंबर अपडेट ठेवावा
हेही वाचा - Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी शेवटची संधी! ‘हे’ काम करा अन्यथा बंद होईल 1500 चा हप्ता
