मुंबई. Shivsena Opration Tiger: शिवसेना शिंदे गटाचं ॲापरेशन टायगर  बऱ्यापैकी यशस्वी झाल्यात जमा आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 6 फुटीर खासदार आज राजकीय पहिल्यांदाच माध्यमांसमोर येऊन आपली अधिकृत भूमिका जाहीर करणार आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदेसोबतच फोटो व आणखी काही पुरावे समोर येण्याची शक्यता असून त्याआधी ठाकरेंचे फुटलेले 4 खासदार आज दिल्लीहून मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत. हे खासदार मुंबईत दाखल होताच ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत त्यांच्यावर आसूड ओढले आहेत.

शिवसेनेचे संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे आणि नागेश पाटील आष्टीकर आज दुपारी 1.30 वाजता विशेष विमानाने मुंबई विमानतळावर दाखल झाले. यानंतर सर्वजण आपल्या खाजगी वाहनाने एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाकडे रवाना झाले. ओमराजे निंबाळकर सध्या धाराशीवमध्ये असून तेही मुंबईत दाखल होत आहेत. मुंबई ईशान्य मतदारसंघातील खासदार संजय दिना पाटील मुंबईतच आहेत. सर्व सहा खासदार आज आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करणार आहेत.

उद्धव ठाकरेंच्या ज्या ६ खासदारांवर ऑपरेशन टायगर राबवले गेले ते सर्व फुटले असून शिंदे गटाला जाऊन मिळणार आहेत. या नाट्याचा आज मुंबईत शेवट होणार आहे. ठाकरे गटातील 6 बंडखोर खासदार दिल्लीहून मुंबईत परतले असून शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर त्यांचा शिंदे गटात अधिकृत प्रवेश होणार असून चार वाजता ते प्रेस कॉन्फरसद्वारे माध्यमांशी संवाद साधणार असल्याचे सांगितले जात आहे.

फुटीर सहा खासदाराचे दिल्लीतून मुंबईत आगमन होताच संजय राऊत यांनी एक मोठं ट्विट करत या सर्व खासदारांवर हल्ला चढवला. ‘ 50 50 कोटीला विकले गेलेले चार खासदार मुंबई विमानतळावर उतरले … ये जिना भी क्या जिना है लल्लू?’ असं विचारत संजय राऊत यांनी फुटीर खासदांरावर जोरदार टीका केली आहे.

संजय राऊत यांनी काय केलंय ट्विट?

50 50 कोटीला विकले गेलेले चार खासदार मुंबई विमानतळावर उतरले आणि भेदरलेल्या नजरेने शशस्त्र पोलिस गराड्यात बाहेर पडले ये जिना भी क्या जिना है लल्लू? चित्रगुप्ताने पापांचा हिशोब लिहायला सुरुवात केली आहे! ह्यांची पुढील पिढी सांगेल मेरा बाप गद्दार था मेरा पती गद्दार थ मेरा नाना गद्दार था! जय महाराष्ट्र! असं ट्विट संजय राऊतांनी केलं आहे.