जेएनएन, मुंबई. Maharashtra Political News: उद्धव ठाकरे यांचे जवळचे नेते म्हणून म्हणल्या जाणारे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर लांजा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. त्यांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला आहे. (Rajan Salvi Resign) हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे.

नैतिक जबाबदारी स्विकारत दिला राजीनामा

बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून शिवसैनिक ते विविध पदाच्या माध्यमातून संघटना बांधण्याच्या अनुषंगाने गेली 35 वर्षे काम करीत आलो आहे. मी राजापूर विधानसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारत आहे.

तसंच, सद्यस्थितीत मतदार संघात संघटनेत घडणाऱ्या घडामोडी पाहता मी संघटनात्मक बांधणेच्या अनुषंगाने उपनेते पदाच्या कार्याला योग्य न्याय देऊ शकत नाही. तरी मी पराभवाी नैतिक जबाबदारी घेऊन उपनेते पदाचा राजीनामा देत आहे, असं राजन साळवी यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे गटात करणार प्रवेश

    माजी आमदार राजन साळवी यांचा उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) गटाला रामराम केला आहे. ते गुरुवारी दुपारी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात प्रवेश करणार आहेत, अशी चर्चा आहे.

    शिंदे गटाची ताकद वाढणार

    राजन साळवी (Rajan Salvi) यांनी शिंदे गटात प्रवेश केली तर शिंदे गटातील कोकणातील ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तसंच, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांना मोठा फायदा होऊ शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.