जेएनएन, मुंबई. ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत ते, तीव्र चक्रीवादळात (Severe Cyclonic Storm) रूपांतरित होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. या चक्रीवादळाचा संभाव्य परिणाम दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीवर होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
शक्ती उद्या अरबी समुद्राच्या मध्य भागात पोहोचेल
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, शक्ती चक्रीवादळ तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते 5 ऑक्टोबरपर्यंत पश्चिम-नैऋत्येकडे सरकून उत्तर आणि मध्य अरबी समुद्राच्या मध्य भागात पोहोचेल.
भारतीय हवामान विभागाने सर्व मच्छीमार, मच्छीमार सहकारी संस्था आणि नौका मालकांना कडक सूचना दिल्या आहेत की, पुढील काही दिवस समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये. वादळी वारे आणि उंच लाटा येण्याची शक्यता असल्याने समुद्र अत्यंत खवळलेला राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मत्स्यव्यवसाय विभागाने सर्व किनारी जिल्हा प्रशासनांना निर्देश दिले आहेत की, या सूचनेची माहिती सर्व मच्छीमार आणि किनारी गावांतील नागरिकांपर्यंत त्वरीत पोहोचवावी. सागरी सुरक्षितता आणि जीवितहानी टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे.
ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत ते, तीव्र चक्रीवादळात (Severe Cyclonic Storm) रूपांतरित होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. या चक्रीवादळाचा संभाव्य परिणाम दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीवर…
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) October 4, 2025
6 ऑक्टोबरपर्यंत इशारा जारी
हवामानशास्त्रज्ञ अभिजीत मोडक यांच्या मते, चक्रीवादळ शक्तीमुळे सौराष्ट्र आणि कच्छमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात तयार होणाऱ्या या चक्रीवादळाचा परिणाम 4-6ऑक्टोबरपर्यंत होईल. 5 ऑक्टोबर रोजी ते गुजरात, महाराष्ट्र आणि पाकिस्तानच्या किनारपट्टीवर विनाश घडवू शकते.
शक्ती चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर 45-65 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तथापि, वादळाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
गुजरात आणि महाराष्ट्रातील मच्छिमारांना 3 ते 6 ऑक्टोबर दरम्यान समुद्रापासून दूर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकारांनी पर्यटकांना समुद्राजवळ जाऊ नये अशा सूचनाही जारी केल्या आहेत.