जेएनएन, मुंबई. शक्ती चक्रीवादळ (Shakti Cyclone) महाराष्ट्राकडे सरकत आहे, त्यामुळे मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या मते, ते गुजरातमधील द्वारकेला धडकू शकते आणि मुंबई, रायगड, ठाणे सारख्या भागात विनाश घडवू शकते. त्यातच आज हवामान विभागाने अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे.
किनारपट्टीवरील जिल्ह्यांना इशारा
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार दि. 3 ते 7 ऑक्टोबर दरम्यान उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी आणि जवळपासच्या भागांमध्ये ताशी 45-55 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
‘या’ 15 जिल्ह्यांत मुळसधार पावसाचा अलर्ट
भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार आज अहिल्यानगर, सोलापूर, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड, लातुर, नागपुर, वर्धा, चंद्रपुर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार दि. ३ ते ७ ऑक्टोबर दरम्यान उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी आणि जवळपासच्या भागांमध्ये ताशी ४५-५५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) October 4, 2025
भारतीय हवामान विभागाच्या मुंबई… pic.twitter.com/gke0IpP6Ef
मुंबईत हलक्या पावसाची शक्याता (Mumbai Weather Update)
शक्ती चक्रीवादळाचा परिणाम हा मुंबईवरही होऊ शकतो. मुंबई शहर व उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.