जेएनएन, मुंबई - मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज (मंगळवार) सकाळी अचानक गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. इंडिगो एअरलाईन्स मॅनेजमेंट आणि प्रवाशांमध्ये झालेल्या विसंवादामुळे एका विमानाचे उड्डाण रखडले. प्रवाशांना यामुळे मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागला.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, विमान उड्डाणासाठी सज्ज असताना एअरलाईन्स मॅनेजमेंट आणि प्रवासी यांच्यात तणाव निर्माण झाला. या वादामुळे काही काळ विमानतळावरील कामकाज ठप्प झाले आणि उड्डाण थांबवण्यात आले. प्रवासी ताटकळत बसले असल्याने वातावरण अधिकच तणावग्रस्त झाले होते. तत्काळ चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यात आला. त्यानंतर थांबलेले विमान मार्गस्थ करण्यात आले आहे.
प्रवाशांची गैरसोय-
विमानाचे उड्डाण रखडल्याने प्रवाशांना विमानतळावरच थांबावे लागले. काही जणांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. याबाबत काहीच माहिती न मिळाल्याची तक्रार प्रवाशांनी केली.
परिस्थिती नियंत्रणात -
चर्चेनंतर वातावरण शांत झाले असून सध्या विमानतळावरील कामकाज सुरळीत सुरू आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.