एजन्सी, मुंबई. Uddhav Thackeray on Bhayyaji Joshi: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते सुरेश भैय्याजी जोशी यांच्या मराठी भाषेवरील कथीत वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. यानंतर शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

ठाकरेंचा भाजपा आणि आरएसएसवर आरोप

येथील विधान भवन संकुलात पत्रकारांशी बोलताना, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री जोशी यांच्या वक्तव्यातून मुंबईचे विभाजन करण्याचा आरएसएस आणि भाजपचा छुपा अजेंडा दिसून येतो असा आरोपही त्यांनी केला.

'मुंबईत मराठी भाषा येणं गरजेचं नाही'

मुंबईत मराठी भाषा येणं गरजेचं नाही, हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा असून केवळ फूट पाडण्यासाठी हा मुद्दा वापरला जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. 

जोशी काय म्हणाले...

    बुधवारी घाटकोपर परिसरातील एका कार्यक्रमात जोशी म्हणाले की, "मुंबईची एकच भाषा नाही. मुंबईच्या प्रत्येक भागाची वेगळी भाषा आहे. घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे. त्यामुळे जर तुम्ही मुंबईत राहत असाल तर तुम्हाला मराठी शिकण्याची गरज नाही."

    जोशी यांचं स्पष्टीकरण

    त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी जोरदार टीका केल्यानंतर, जोशी यांनी गुरुवारी सांगितले की मराठी ही मुंबईची भाषा आहे आणि बाहेरून येणाऱ्या आणि इतर भाषा बोलणाऱ्यांनीही ती समजून घेतली पाहिजे, असं आपला वक्तव्य दुरुस्त केलं. "मराठी ही माझी मातृभाषा आहे आणि मला तिचा अभिमान आहे," असे ते म्हणाले. घाटकोपर कार्यक्रमातील त्यांच्या विधानांचा चुकीचा अर्थ लावण्यात आला, असं त्यांनी सांगितलं.

    ठाकरे यांनी जोशींना गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगालमध्ये अशी विधाने करण्याचे आणि सुरक्षितपणे परत येण्याचे आव्हान दिले. "मराठी माणूस" स्वागतार्ह आहे म्हणून याचा अर्थ असा नाही की कोणीही त्यांना काहीही म्हणू शकतो, असे ठाकरे म्हणाले.

    राज ठाकरे यांनीही भैय्याजी जोशी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या विधानावर सविस्तर भूमिका मांडली आहे. भय्याजी जोशी यांच्या विधानाचा त्यांनी निषेध केला आहे.