जेएनएन, मुंबई. Maharashtra Weather Update: मुंबई महाराष्ट्रात काल मुसळधार पावसाने झोडपले आहे. आजही राज्यात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आज मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

आज कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश, मुसळधार पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मुंबईत पावसाने जोर पकडला आहे. आज मुंबईत जोरदार पाऊस पडण्याची  शक्यता हवमान विभागाने वर्तवली आहे. तर राज्यात वाऱ्यांचा वेग 40 ते 50 किलोमीटर प्रती तास असणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढला असून आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. आज मुंबई शहरात दिवसभर ढगाळ वातावरण असून जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

अरबी समुद्रामध्ये चक्रीय वादळ निर्माण झाले असून त्याचा परिणाम मुंबईवर दिसत आहे. या दरम्यान पावसाशिवाय मेघगर्जना आणि वाढत्या वाऱ्यांचा वेग अनुभवाला येणार आहे. 

कोकण विभागातील मुंबई ,पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ‘येलो आणि काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. 

मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार आहे. 

    विदर्भात वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. 

    मध्य महाराष्ट्रात नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, सांगली या जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे.