एजन्सी, मुंबई. Mumbai Rain Latest Update: आज सकाळी मुंबईत हलक्या सरींसह पाऊस पडला, भारतीय हवामान खात्याने (IMD) आज आकाश ढगाळ राहण्याची आणि अतिमुसळधार पावसाची (Heavy Rain in Mumbai) शक्यता वर्तवली आहे.
भारतीय हवामान खात्यानुसार, मुंबईत आज अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर राज्यात वाऱ्यांचा वेग 40 ते 50 किलोमीटर प्रती तास असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
पुढील 48 तासांत मुसळधार पाऊसाची शक्यता
मुंबई शहर आणि उपनगरातील काही ठिकाणी ढगाळ अकाश, तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच, येत्या 48 तासांत मुंबईसह परिसरात 40-50 किमी प्रतितास वेगाने वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर आज पुढील 3, 4 तासांत मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथे वेगवेगळ्या तीव्रतेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
रविवारी रात्री उशिरा झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचल्याची नोंद झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मुंबई शहर आणि आसपासच्या परिसर आणि उपनगरीय भागात नारिंगी ते लाल रंगाचे अलर्ट जारी केले आहेत.
हेही वाचा - Mumbai Rains: 15 वर्षांचा विक्रम मोडणार? मान्सून राज्यात वेळेआधीच दाखल, कोकण-घाट परिसरात अतिवृष्टीचा धोका!
26 May, Mumbai... Next 3,4 hrs rains likely to continue with varying intensity, Mumbai Thane, Navi Mumbai pic.twitter.com/bBe8hpCh8q
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 26, 2025
राज्यात अलर्ट
कोकणाला पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात आजपासून पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट आहे. मराठावड्यात दोन दिवसांसाठी येलो अलर्ट आहे. विदर्भात पुढील चार दिवसांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे.