मुंबई. Mumbai Pune Expressway Traffic : खंडाळा घाटात गॅस टँकर उलटल्यामुळे टप्प झालेली वाहतूक कोंडी 32  ते 33 तासांनंतर मोकळी झाली. गुरुवारी सकाळी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेच्या मुंबईकडे जाणाऱ्या कॅरेजवेवरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली होती. मात्र आता पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर लोणावळ्याजवळ सिमेंटचा कंटेनर बंद पडल्याने भीषण वाहतूक कोंडी झाली आहे. 20 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

पुणे-मुंबई मार्गावर आडोशी बोगद्याजवळील गॅस टँकरचा अपघात आणि आता लोणावळ्याजवळ बंद पडलेला सिमेंट कंटेनर यामुळे गेल्या दोन दिवसांत दुसऱ्यांना हा मार्ग पुन्हा ठप्प झाला आहे. लोणावळ्याजवळ 20 किमीपासून वाहनांच्या रांगा लागल्या असून वाहने संथ गतीने पुढे जात आहेत. आडोशी बोगद्याजवळ काल गॅस टँकर उलटल्याने सुरक्षेच्या कारणास्तव सर्व वाहने अडकून पडली होती. तब्बल 32 तासांच्या प्रयत्नांनंतर हा टँकर मार्गावरून हटवण्यात यश आले, मात्र कोंडी फुटेत न फुटते तोच तळेगाव ते मळवली दरम्यान एक सिमेंट कंटेनर रस्त्याच्या मधोमध बंद पडला. यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक पुन्हा एकदा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.

सध्या वाहतुकीची परिस्थिती काय?

लोणावळा परिसरात सिमेंट वाहतूक करणारा कंटेनर रस्त्यातच बंद पडल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. महामार्ग पोलीस आणि आयआरबीची टीम घटनास्थळी दाखल झाली असून कंटेनर बाजूला करण्याचे काम सुरू आहे. मात्र, नुकत्याच वाहतूक कोंडीतून बाहेर पडल्या वाहनांच्या पुन्हा लांब रांग लागल्या आहेत.  सध्या लोणावळ्यापासून 20 किलोमीटर आधीपासूनच वाहने अडकून पडली आहेत. मावळ परिसरातून एक्सप्रेस वेवर येणाऱ्या प्रवाशांना या भीषण कोंडीचा सामना करावा लागत आहे. 

32 तासानंतर पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरू -

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अधिकाऱ्याने सांगितले की, अत्यंत ज्वलनशील प्रोपीलीन वायू वाहून नेणारा टँकर घाट विभागातील आडोशी बोगद्याजवळील अपघातस्थळावरून काढून टाकण्यात आला, ज्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या कॅरेजवेवरील वाहतूक पहाटे 1.46 वाजता पुन्हा सुरू झाली.

    मुंबई-पुणे एक्सप्रेसवे हा भारतातील पहिला 6-लेन काँक्रीट, प्रवेश-नियंत्रित टोल असलेला एक्सप्रेसवे आहे. हे मुंबई, रायगड आणि नवी मुंबईला पुण्याशी जोडणार महामार्ण 94.5 किमीपर्यंत पसरलेला आहे.

    मंगळवारी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या कॅरेजवेवर टँकर उलटला, ज्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आणि हजारो वाहने तासन्तास एक्सप्रेसवेवर अडकून पडली.

     वाहतूक कोंडीमुळे 20 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महिला आणि मुलांसह प्रवासी अनेक तास त्यांच्या वाहनांमध्ये अन्न, पाणी किंवा शौचालयाच्या सुविधेशिवाय अडकून पडले होते.  बुधवारी रात्री उशिरा उलटलेल्या टँकरमधून प्रोपीलीन गॅस सुरक्षितपणे इतर टँकरमध्ये हलवण्यात आला आणि अपघातग्रस्त वाहन हेवी-ड्युटी क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आले, असे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्याने सांगितले.

    महामार्गावर उलटलेला टँकर काढून टाकल्यानंतर बुधवारी पहाटे 1 बजकर 40 मिनिटांनी पुणेहून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली तर काही वेळाने  मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूकही सुरू झाली.

    गाडीत घालवावी लागली रात्र -

    ट्रक, बस, कार आणि इतर वाहने एक्सप्रेस वेवर अनेक तास अडकून पडली. प्रवाशांना संपूर्ण रात्र गाडीमध्ये घालवावी लागली. कोंडीत अडकलेल्या लोकांना खाण्या-पिण्याचीही असुविधा सहन करावी लागली. या जाममुळे लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.