जेएनएन, मुंबई: महाराष्ट्रातील प्रमुख महामार्गांवरील अपघात आणि मृत्यूच्या घटनांत गेल्या वर्षभरात मोठी तफावत दिसून आली आहे. काही महामार्गांवर सुरक्षा उपाययोजना वाढल्याचा सकारात्मक परिणाम जाणवत आहे,तर काही ठिकाणी मृत्यूंचे प्रमाण उलट वाढले आहे. त्यामुळे राज्यातील वाहतूक सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
समृद्धी महामार्गावर मृत्यूंची 16% वाढ
राज्याचा सर्वात आधुनिक समृद्धी महामार्ग अपघातांसाठी पुन्हा चर्चेत आला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, या मार्गावर वाहन अपघातातील मृत्यू 16 टक्क्यांनी वाढले आहेत.
वेगमर्यादा ओलांडणे, दीर्घ सरळ रस्ता, वाहनचालकांचा थकवा आणि लेन-शिस्त न पाळल्याने अपघाताचे प्रमाण वाढले वाढले.
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर 29% मृत्यूंची घट
देशातील पहिला एक्सप्रेसवे असलेल्या मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर मृत्यूंच्या घटनांमध्ये 29 टक्क्यांनी घट झाली आहे.
येथे वाढवलेली रस्ते निरीक्षण यंत्रणा, सुसंघटित पॅट्रोलिंग, कॅमेऱ्यांद्वारे नियंत्रण, सुरक्षा बॅरियरची दुरुस्ती आणि वेगमर्यादा अंमलबजावणी याचा परिणाम झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
इतर महामार्गांवरही अपघातांचा धोका कायम
ठाणे–नाशिक, पुणे–सातारा, नागपूर–हैदराबाद, कोल्हापूर–बेंगळुरू या मार्गांवर अपघातांचे प्रमाण सतत वाढत आहे.
काही ठिकाणी चौपदरीकरण आणि डांबरीकरणातील उणिवा यामुळे अपघातांचा धोका वाढत आहे.
हेही वाचा: महाराष्ट्रात हिवाळ्याचा पहिला झटका; ठाणे–नवी मुंबई–भिवंडीमध्ये वायुप्रदूषण धोक्याच्या पातळीवर
