जेएनएन, मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह (NMIA) आणि दक्षिण मुंबईतील महत्त्वाकांक्षी भूमिगत मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. या व्यतिरिक्तही काही महत्त्वाचे पायाभूत सुविधा प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (Navi Mumbai International Airport)

  • अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा आता पूर्णत्वास येत आहे. 
  • या विमानतळामुळे मुंबई विमानतळावरील गर्दीचा मोठा ताण हलका होणार आहे.
  • पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार असल्याने संपूर्ण कोकण व मुंबई परिसरातील जनतेत उत्सुकता आहे.

दक्षिण मुंबईतील भूमिगत मेट्रो

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण मुंबईतील भूमिगत मेट्रो मार्गाचे उद्घाटन करणार आहेत.
  • हा मेट्रो प्रकल्प सुरू झाल्यास दादर, वरळी, हाजी अली, सीएसएमटी अशा महत्त्वाच्या भागांतील वाहतूक कोंडीला मोठा दिलासा मिळणार आहे.
  • पर्यावरणपूरक आणि वेगवान प्रवासाचा नवा पर्याय मुंबईकरांना मिळणार आहे.

इतर प्रकल्पांचे लोकार्पण

मुंबईतील काही उड्डाणपूल, रस्त्यांचे चौपदरीकरण व विकासकामे देखील पंतप्रधानांच्या हस्ते सुरू किंवा उद्घाटन करण्यात येणार आहेत. 

मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधांना गती देण्यावर या दौऱ्यात भर राहणार आहे.

    सुरक्षा आणि तयारी

    पंतप्रधानांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस व सुरक्षा यंत्रणांनी तयारी सुरू केली आहे.