जेएनएन, मुंबई. Pahalgam Terror Attack: पहलगाम, जम्मू - काश्मीर येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील काही नागरिकांना दुर्दैवाने आपला जीव गमवावा लागला. यात कल्याण लोकसभा मतदारसंघातील डोंबिवली शहरातील तीन रहिवाशांचा देखील समावेश आहे. यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचे पार्थिव मुंबई विमानतळावर आणण्यात आले आहे. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित राहून पार्थिवाला पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली शहरातील नवापाडा, पांडुरंग वाडी आणि नांदिवली परिसरात राहणाऱ्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा मृत्यू  झाला आहे. त्यांचे पार्थिव आज मुंबईत आणण्यात आले आहे.

हेही वाचा - Pahalgam Attack: लष्करचा मुखवटा आणि ISI ची ढाल... कोण आहे दहशतवादी संघटना TRF, कुठे लपला आहे त्याचा म्होरक्या?

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्यात देशातील 27 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यात महाराष्ट्रातील सर्वांधिक 6 जणांचा समावेश आहे.

सहा जणांचा मृत्यू

    पुण्यातील कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे, ठाण्यातील हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचा मुंबई परीसरातील संजय लेले आणि दिलीप डिसले या सहा जणांचा पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

    मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

    या भ्याड दहशतवादी हल्ल्यात प्राण गमवावे लागलेल्या राज्यातील एकूण 6 जणांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारने जाहीर केली असून जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.