जेएनएन, मुंबई. Sea Helipad on Coastal Road : मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पामुळे शहराच्या वाहतुकीला वेग मिळाला आहे. आता या वेगाला हवाई वाहतुकीची मदत मिळणार आहे. मुंबई महानगरपालिका कोस्टल रोडवरच (Coastal Road) सी हवाई सेवा देणार आहे. महापालिका कोस्टल रोडवरच ‘सी-हेलिपॅड’ (sea Helipad) उभारण्याचा विचार करत असल्याची माहिती मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे.
सी-हेलिपॅड’ म्हणजे काय!
कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामादरम्यान वरळी डेअरीसमोर आणि अमरसन्स गार्डनजवळ दोन तात्पुरत्या जेट्टी बांधण्यात आले आहे. यातील वरळी जेट्टीच्या जागेवर हेलिपॅड उभारण्याची योजना महापालिकेने आखला आहे.
या संकल्पनेनुसार, हेलिकॉप्टर समुद्रावर उतरवण्याची सुविधा असलेले हेलिपॅड तयार करण्यात येणार आहे. ही सुविधा आपत्कालीन रुग्णांची वाहतूक, आपत्ती व्यवस्थापन, आणि हवामार्गाने जलद संपर्क साधण्यासाठी संजीवनी ठरणार आहे.
काय म्हणाले भूषण गगराणी !
कोस्टल रोडमुळे मुंबईकरांच्या धावत्या आयुष्याला वेग मिळाला आहे. आता हवाई वाहतुकीची जोड देऊन मल्टिमॉडेल ट्रान्सपोर्ट प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न आहे. शहरात वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर हे हेलिपॅड अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.आपत्कालीन वैद्यकीय गरज, रुग्णांचे जलद स्थलांतर, तसेच आपत्ती काळात मदतीचा त्वरित पुरवठा करण्यासाठी याचा उपयोग केला जाईल.